कृषीवार्ता

द्राक्षे व बेदाणा क्लस्टर अंतर्गत द्राक्ष व बेदाणा निर्यातीस चालना

Spread the love

कृषि निर्यात धोरण अंतर्गत अपेडा, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर, कृषि उत्पन्न बाजार समिती,तासगाव व कृषि विभाग, विटा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि.३० मार्च २०२२ रोजी सभागृह बाजार समिती, तासगाव, जि. सांगली येथे निर्यातक्षम द्राक्ष व बेदाणा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते.

सदर कार्यशाळेचे उदघाटन मा. श्री. नवनाथ मस्के, सभापती, कृषि उत्पन्न बाजार समिती,तासगाव यांचे शुभहस्ते करण्यात आले. सदर कार्यशाळेस मा. श्री. मनोजकुमार वेताळ, जिल्हा अधीक्षक, कृषि अधिकारी, सांगली, मा. श्री. सागर खटकाळे, उपविभागीय कृषि अधिकारी, कृषि विभाग, विटा, जि. सांगली, मा. डॉ. अजय शर्मा, जेष्ठ वैज्ञानिक, एन. आर. सी., पुणे, मा. डॉ. विष्णू गलांडे, प्राध्यापक (उद्यानविद्या) प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे, मा. डॉ. शरद गलांडे, प्राध्यापक, राजर्षी शाहू कृषि महाविद्यालय, कोल्हापूर, मा. श्री. अशोक शेठ बाफना, बेदाणा निर्यातदार, सांगली, डॉ. सुभाष घुले, उपसरव्ययस्थापक महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ व श्री. जितेंद्र शिंदे, व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, मा. श्री. चंद्रकांत सूर्यवंशी, सचिव बाजार समिती, तासगाव तसेच मोठ्या प्रमाणात द्राक्षे व बेदाणा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

सदर कार्यशाळेचे उदघाटन प्रसंगी श्री नवनाथ मस्के यांनी द्राक्षे व बेदाणा क्लस्टर अंतर्गत शेतकऱ्यांनी एकत्रित येणे गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ. अजय शर्मा यांनी निर्यातक्षम द्राक्ष व बेदाणा चे संरक्षण व निगा यासंदर्भात सखोल माहिती दिली. डॉ. विष्णू गलांडे यांनी निर्यातक्षम द्राक्ष व बेदाणा पियुकाचे सुगीपश्च्यात तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. शरद गलांडे यांनी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी एकात्मिक कीड नियंत्रण कसे करावे याची सविस्तर माहिती दिली. श्री. अशोकशेठ बाफना यांनी निर्यातक्षम द्राक्ष व बेदाण्याची निर्मिती कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. पणन विभागाचे श्री. जितेंद्र शिंदे यांनी द्राक्ष पिकाच्या पणन व्यवस्थेबाबत माहिती दिली. श्री. सागर खटकाळे यांनी कृषि विभागाच्या विविध योजना तसेच डॉ. सुभाष घुले यांनी पणन विभागाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.उपस्थितांचे श्री अमृतसागर यांनी आभार मानले, तर श्री जितेंद्र शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!