ताज्या घडामोडी

प्रेरणा फाऊंडेशनच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा महाशिवरात्रीच्या शुभदिनी थाटामाटात संपन्न….

Spread the love

प्रतिनिधी-लक्ष्मण राजे

बदलापूर:- मंगळवार दि.१/३/२२ रोजी महाशिवरात्री च्या शुभदिनी प्रेरणा फाऊंडेशनच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा थाटामाटात साजरा करण्यात आला. प्रेरणा फाऊंडेशन ही गरीबांची पर्णकुटी बनली असून, येथे विधवा गरजू महिला अत्याचार झालेल्या गरोदर महिलांसाठी आधार देऊन त्यांचा प्रसुती सुविधा, त्यांना छोट मोठें कामधंदे देऊन उद्योग धंदा व गरीबांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बदलापूर येथे मंगळवारी सायंकाळी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रेरणा फाऊंडेशन अध्यक्षा दिप्ती उर्फ प्रेरणा गावकर यांनी प्रेरणा फाउंडेशनची प्रस्तावना केली. तसेच महिला व पुरुष लघुउद्योग, शिवण क्लास कोर्स, ब्युटीशन कोर्स, प्रेरणा प्रकाशन अंतर्गत नवीन लेखक, लेखिका यांना पुस्तक प्रकाशन साठी मार्गदर्शन केले. प्रेरणा युट्युब चॅनल, व प्रेरणा रंगमंच नाट्यमंडळ याबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले. प्रेरणा फाऊंडेशनचे सचिव वैभव कुलकर्णी व सभासद मा. सुरज गुरव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सभासद सौ. वैशाली चांदेकर, व खजिनदार दिव्या गांवकर यांनी केले. टिटवाळा येथील रणरागिणी मा.सुप्रिया आचरेकर व त्यांची कमिटी, मा.चिंतामण घोलप गुरूजी, मा.पत्रकार राजेश भांगे, मा. श्री.संजीव सुरेशचंद्र जैन, मा.श्री. अविनाश म्हात्रे, मा .कु.शैलेश सणस, मा.श्री.दिलीप नारकर, मा. सुहास सावंत,मा.राजेंद्र नरसाळे, मा. मिलींद आंबेरकर, मा.मिताली आंबेरकर,मा. संजय पारकर , मा.वैशाली चांदेकर मा. विनायक चांदेकर, बालसुंदरम अर्सन, मा.श्रीनिवास शेटकर, सुनिल गावकर, केशव गडगे, इत्यादी 50 लोकांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला श्री. संजय पारकर, उपसचिव दिलेश देसाई, सभासद सुनील गांवकर, यांचे सहकार्य लाभले. तसेच या कार्यक्रमाला सभासद रेश्मा देसाई, दीपिका परब, ऋषिकेश देसाई याचबरोबर अनेक पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.सर्व उपस्थितांना अल्पोउपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!