कृषीवार्ता

संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण- ग्रीन फाऊंडेशन

Spread the love

लोणी काळभोर- तिर्थक्षेत्र रामदरा कोळपे वस्ती येथील ऑक्सिजन पॉईट क्र 3 येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे, संजय कुलुत, प्रितम पाटील, बिरूदेव भास्कर, मयुर चौधरी,विशाल लष्कर ,अभिषेक शेंडगे, उपस्थित होते.

ग्रीन फाऊंडेशन सभासद जीवन जाधव यांनी संत सेवालाल महाराज यांच्या बद्दल माहिती दिली.
संत सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ आणि निधन ४ डिसेंबर १८०६ मध्ये झाला. हे बंजारा समाजाचे संत म्हणून ओळखले जायचे. नाईक कुळातील या भीमा नाईक यांचे ते चिरंजीव होते वडील एवढे श्रीमंत होते कि सात पिढी बसून आरामात जेवण करतील मात्र रूढी आणि परंपरा यांच्याने मागे असलेला बंजारा समाज आपण पुढे न्यावा अशी आस संतगुरु श्री सेवालाल महाराज यांच्या मनात आली.म्हणूनच लहानपणापासूनच संतांच्या गोष्टी वीरांच्या कथा तो आपल्या आई धर्मली माता यांच्या कडून ऐकू लागले.

सिंधू संस्कृती ही भारताची सर्वात सुसंस्कृत आणि प्राचीन संस्कृती मानली जाते. गोर-बंजारा ही या संस्कृतीशी संबंधित एक संस्कृती आहे .या वेळी सूत्रसंचालन राहुल कुंभार यांनी तर किरण भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!