ताज्या घडामोडी

मुंबई विद्यापीठामध्ये डॉ. रामा सरतापे यांची पीएच.डी.चे मार्गदर्शक म्हणून निवड

Spread the love

पावस:–रत्नागिरी तालुक्यातील गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी येथे कार्यरत असणारे अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ . रामा अच्युता सरतापे यांनी . M.A. , Ph . D. , NET.अशा अनेक पदव्या संपादन केलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये १७ संशोधन पेपरचे सादरीकरण व प्रकाशन केले आहे मुंबई विद्यापीठ मुंबई कडून लघु शोध प्रबंध साठी आतापर्यंत 90 हजार रुपये अनुदान मिळाले . त्यांनी अर्थशास्त्र विषयाची चार पुस्तके प्रकाशित केली आहेत . अर्थशास्त्र विषयाचे विविध अभ्यासक्रम तयार करण्यासाठी चेअरमन आणि सदस्य म्हणून काम केले आहे .रत्नागिरी तालुक्यातील विविध महिला बचत गटाला मार्गदर्शन काम पाहिलेले आहे .जिल्हा उद्योग केंद्र रत्नागिरी मध्ये Resource Person म्हणून निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय , पुनर्वसन प्रकल्प विभागामध्ये तज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. समाजामध्ये विविध विषयावर व्याख्याने देऊन समाजप्रबोधनाचे काम करत आहेत . Institute of scholars , Bangalore चा आदर्श शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे. संकल्प कला मंच , रत्नागिरी , यांच्याकडून संशोधनाच्या कामाबद्दल सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाकडून अर्थशास्त्र विषयांसाठी पीएच डी चे मार्गदर्शक म्हणून नुकतीच त्यांची निवड झालेली आहे अशा विविध पदावर ते कार्यरत आहेत त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!