मावळसामाजिक

लुईस ब्रेल यांची जयंती साजरी ..

ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल" यांची जयंती ४ जानेवारी  रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव तालुका मावळ येथे साजरी करण्यात आली.

Spread the love

लुईस ब्रेल यांची जयंती साजरी Celebrating Louis Braille’s birth anniversary.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ६ जानेवारी.

पंचायत समिती मावळ समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण विभाग अंतर्गत “ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल” यांची जयंती ४ जानेवारी  रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव तालुका मावळ येथे साजरी करण्यात आली.

लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
लुईस ब्रेल यांची माहिती  साधना काळे मॅडम यांनी दिली. तसेच ब्रेल लिपी ची माहिती  शकीला शेख यांनी दिली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव शाळेच्या मुख्याध्यापिका  साबळे मॅडम,  राजश्री घोरपडे मॅडम,  जाधव मॅडम,  पटेकर मॅडम, उपस्थित राहून सहकार्य केले.

समावेशित शिक्षण विभागाच्या विशेष साधन व्यक्ती  शितल शिशुपाल, विशेष शिक्षक  स्मिता जगताप,   साधना काळे ,  सुमित्रा कचरे यांनी नियोजन केले. प्रास्ताविक  शकीला शेख यांनी केले तसेच  शितल शिशुपाल यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!