ताज्या घडामोडी

अत्याचाराचा सामना करण्यासाठी आता महिलांना प्रशिक्षणाची गरज -मुंबई पोलीस सर्वतोपरी मदत करण्यास तयार

Spread the love

मुंबई – अत्याचाराचा सामना करण्यासाठी प्रथम महिलांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. ते प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई पोलीस सर्वतोपरी मदत करतील, असे आश्वासन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ व स्वयं फाऊंडेशनतर्फे `निर्भया पथक’ या स्त्रियांच्या संरक्षणासाठी आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमात दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत `निर्भया पथक’ या मुंबई पोलिसांमार्फत स्त्रियांच्या संरक्षणासाठी सुरू झालेल्या योजनेचा कार्यारंभ नुकताच झाला. या विषयावर पत्रकार संघात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी संजय पांडे म्हणाले, महिलांना संरक्षण देण्यासाठी ३ प्रकारचे कायदे आहेत. यात बाल लैंगिक अत्याचार कायदा, पोक्सो कायदा व भारतीय दंड विधान संहिता कलम ४९८ अन्वये संरक्षण ! हे तिन्ही कायदे हे महिलांच्या सक्षमीकरणाकरिता वेळोवेळी साहाय्य करीत असतात. परंतु स्त्रियांना योग्यवेळी शिक्षण देणे, नोकरीमध्ये सक्षमीकरण करणे आदी गोष्टी आपण केल्या पाहिजेत. कारण ६० ते ८० वयापर्यंत महिलांना कोणत्याही प्रकारचे कायद्यामध्ये संरक्षण नाही. त्याकरिता या वयोगटातील महिलांना कसे संरक्षण देता येईल व कसा न्याय देता येईल, याबाबत निर्भया पथकाने योग्य तो विचार करावा. काही मदत लागेल ती आम्ही देऊ.याचबरोबर महिलांनी कोणत्याही अत्याचाराला बळी न पडता पोलिसांत रितसर तक्रार दाखल करावी. जेणेकरून संबंधितांवर कठोर कारवाई करणे सोपे जाईल. लेखी तक्रार केली तरच निर्भया पथकाचा उद्देश सफल होईल, असे मला वाटते. तसेच महिलावरील अत्याचार करणारा `शक्ती’ कायदा अस्तित्वात आला आहे. हा कायदा महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघाने पत्रकारांच्या माध्यमातून या समस्येला वाचा फोडावी, असे आवाहन देखील त्यांनी केले. संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी प्रास्ताविक करताना म्हटले की,संजय पांडे यांच्या रूपात आज मुंबई पोलीस आयुक्तपदी धडाडीचे पोलीस आयुक्त आपल्याला लाभले आहेत. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.स्वयं फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. निलेश पावसकर म्हणाले की,महाराष्ट्रामधील स्त्रियांवरील अत्याचार यांचे प्रश्न जलदगतीने निकाली काढण्यासाठी आम्ही निर्भया पथकाची स्थापना केलेली आहे. ते पोलिसांना वेळोवेळी त्यांच्या कामांमध्ये मदत करतील असे मी आश्वासन देतो व आज १५० महिलांचे `निर्भया पथक’ स्थापन झाल्याचे जाहीर करतो. यावेळी फाऊंडेशनने या योजनेसाठी निवडलेल्या मुंबईतील व नवी मुंबईतील १०० स्त्री स्वयंसेविका आज या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. आग्रीपाडा, पार्कसाईट, नायगाव मीरा-भाइंर्दर, कांजूरमार्ग, नालासोपारा, नवी मुंबई, विक्रोळी आदी भागातून या महिला यावेळी उपस्थित होत्या. त्यामुळे पत्रकार संघाचे सभागृह तुडूंब भरले होते.शेवटी संघाचे कार्यवाह विष्णू सोनवणे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!