कृषीवार्ता

बिळाशीत धस कुटुंबानी घेतले ५६ गुंठ्यांत कलिंगडाचे ५० टन उच्चांकी उत्पादन

Spread the love

कोकरुड/ प्रतापराव शिंदे
योग्य पद्धतीने केलेल्या नियोजनातून शेती मध्ये आपण भरघोस उत्पादन घेऊ शकतो हे दाखवून दिले आहे. बिळाशी- धसवाडी ता.शिराळा येथिल प्रगतशील शेतकरी आनंदराव धस, शोभा धस, सागर धस, वैभव धस या कुटुंबाने . त्यांनी केलेल्या 56 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये ‘मेलोडी’ जातीच्या कलिंगडाचे तीन महिन्यांमध्ये दोन लाख रुपये खर्च वगळता सुमारे चार लाखांचा निव्वळ नफा घेतला असून त्यांनी कृषी मार्गदर्शकांच्या सल्ल्याने व आपल्या कुटुंबाच्या मेहनतीने घेतलेले हे उत्पादन अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे आहे. धस यांनी जानेवारी महिन्यात मेलोडी वानाच्या जातीचे कलिंगडच्या बियांचे ट्रेमध्ये रोपण केले. नांगरणीपुर्वी शेतामध्ये पिकाला आवश्यक अन्नद्रव्य मिळण्यासाठी, जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सुमारे 30 टन शेणखत आणि निंबोळी पेंड असा भेसळ डोस टाकला. त्यानंतर साडे चार फुटांचे अंतरावर बेड तयार करून त्यावर मंचींग पेपर टाकून ठिबक सिंचन केले. फेब्रुवारी महिन्यांत रोप लावन केली.त्यानंतर अठराव्या दिवशी जीवामृत आळवणी घातले. बेडमधील पालापाचोळा कुजण्यासाठी मधून ‘डी कंपोजर’ व बुरशीनाशक ‘ट्रायकोडर्मा’ ही औषधे ठिबक मधून सोडण्यात आली. गरजेनुसार निमार्क फवारणी केली. त्यानंतर कलिंगड वेलांनां गरजेनुसार रासायनिक खतांचा थोड्या प्रमाणात वापर केला. इतर पिकातील रोगराई पसरू नये म्हणून दोन फुटांवर झेंडुंच्या फूलांची लागवड केली. यातुन ही भरघोस उत्पादन मिळून सुमारे वीस हजार रुपये मिळाले. वेळच्या वेळी पिकांची घेतलेल्या काळजी मुळे कलिंगड पिकाला चांगलीच फळ धारणा झाली.यामध्ये सुमारे दोन किलो पासून सात किलो वजनाची कलिंगड फळे जोपासली. यामुळे ५६ गुंठ्यांत ५० टन उत्पादन मिळाले. मुंबई, सातारा, सांगली,मिरज, कोल्हापूर येथील व्यापाऱ्यांनी सदर कलिंगड फ्लाॅटला भेटी दिल्या. धस कुटुंबाने या अगोदर सुमारे पाच वर्षांपूर्वी कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे यांच्या प्रेरणेतून कलिंगड व वांगी हे संयुक्त पिक घेऊन विक्रमी उत्पादन घेतले होते. सदर कलिंगड पिकाच्या प्लाॅटसाठी आंबेजोगाई येथिल कृषी मार्गदर्शक अनिल आवटे, शिराळा तालुका कृषी अधिकारी जी.एस.पाटील, कृषी पर्यवेक्षक अरविंद शिंदे, अजित भोसले, कृषी सहायक सतलिंग मिटकरी आदींचे मार्गदर्शन लाभले.सोशल

मिडीयाच्या मार्केटिंगमुळे मिळाला चांगला दर
आई-वडिलांच्यामुळे सुरवातीपासून शेतीची आवड असणारे बी.काॅम पर्यंतचे शिक्षण घेतलेला सागर व बी.ई.सिव्हील इंजिनिअरची पदवी असलेला वैभव यांनी कलिंगडे तोडणी योग्य झाल्यावर . सदर कलिंगड प्लाॅटचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर मुंबई, सातारा, सांगली कोल्हापूर मिरज येथील व्यापाऱ्यांनी भेट देऊन खरेदीसाठी मागणी केली. यामुळे सुमारे टनास बारा हजार रुपये हा चांगला दर मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!