क्राईम न्युजमावळ

तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथील लेखापाल याचेवर लाच मागणी प्रकरणी कारवाई.

नरेंद्र अनंतराव कणसे, वय ५५ वर्ष पद लेखापाल (वर्ग-३) तळेगाव दाभाडे

Spread the love

तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथील लेखापाल याचेवर लाच मागणी प्रकरणी कारवाई.Action taken against Accountant of Talegaon Dabhade Municipal Council in case of demand for bribe.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २८ सप्टेंबर.

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७.७.अ.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग / घटक पोलीस स्टेशन व गुन्हा नोंद क्रमांक तळेगांव दाभाडे पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड, गु.र.नं. ५१२ / २०२३

नरेंद्र अनंतराव कणसे, वय ५५ वर्ष पद लेखापाल (वर्ग-३) तळेगाव दाभाडेआरोपी लोकसेवकाचे नाव व कार्यालयनगरपरिषद. ५,०००/- रुपये (पाच हजार रुपये)मागणी केलेली लाचेची रक्कम तडजोडीअंती लाच मागणी रक्कम ५,०००/- रुपये (पाच हजार रुपये)पडताळणी दिनांक २२/०८/२०२३, २३/०८/२०२३ ०१/०९/२०२३ १३/०९/२०२३ व दि. १४/०९/२०२३. गुन्हा दाखल दिनांक :- २७/०९/२०२३.

यातील तक्रारदार हे तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथील कॉन्ट्रॅक्टर असून, त्याना तळेगाव दाभाडे नगरपरिषदे मार्फत स्मशानभुमी मध्ये गॅस शव दाह वाहिनीचा ठेका मिळालेला आहे. तसेच कोव्हीड च्याकाळात तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत सॅनिटायझरची फवारणीचा ठेका त्यांना मिळाला होता. तक्रारदार यांनी | कोव्हीडच्या काळात सॅनिटायझरची फवारणी केल्याचे बिल मंजुर करण्यासाठी लोकसेवक नरेंद कणसे, लेखापाल यांनी तक्रारदार यांचेकडे बिलाच्या एक टक्के रक्कमेची मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांना सदरची रक्कम दिली नाही. तसेच सद्यस्थितीत तक्रारदार यांचे गॅस शव दाह वाहिनीचे बिल तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमधील लेखापाल लोकसेवक श्री. नरेंद कणसे यांचेकडे पेंडीग असून, सदर बिल काढण्यासाठी व मागिल बिल काढण्याठी एक टक्क्याप्रमाणे लाच रक्कम मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला. प्र. वि. पुणे येथे दिली होती.

सदर तक्रारीची पडताळणी केली असता, लोकसेवक नरेंद कणसे, अकाऊंटंट यांनी तक्रारदार यांचेकडे कोव्हीड काळात केलेल्या सॅनिटायझर फवारणीच्या प्रलंबित बिलाचे व सद्यस्थितीत गॅस शव दाह वाहिनीच्या बिलाच्या टक्केवारीनुसार मंजुर केलेल्या बिलाचा मोबदला म्हणुन तक्रारदार यांचेकडे ५,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने वरील प्रमाणे लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणेलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!