राजकीय

जाता जाता उद्धव ठाकरे यांनी घेतलेला योग्य व महत्वपूर्ण निर्णय – सामाजिक कार्यकर्ते अनंत दाभोळकर

Spread the love

प्रतिनिधी-लक्ष्मण राजे

मुंबई:- महाराष्टाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या पूर्वी उशिरा का होईना औरंगाबादचे नामांतर “छत्रपती संभाजी नगर”, नवी मुंबईच्या विमानतळाला “लोकनेते दि.बा.पाटील ” तसेच उस्मानाबादचे नामांतर “धाराशीव ” करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाता जाता योग्य व महत्वपूर्ण असे निर्णय घेतलेले आहेत. जे महाराष्ट्रातील जनतेला मान्य आहेत. हा महत्त्वपूर्ण निर्णय नव्याने येणाऱ्या मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाला बदलता येणे शक्य नाही. कारण ही जनतेची मागणी आहे. या सबंधी सत्ताधारी व विरोधी पक्ष नेत्यांनीसुद्धा मागणी केलेली होती. त्यामुळे आकसापोटी निर्णय बदलणे शक्यच होणार नाही. काही निर्णय वादातीत असतात. तसेच पक्षांतर्गत हेवेदाव्यामुळे कधी कधी तर जनतेला विश्वासात न घेता आणि न जुमानता घेतलेले असतात. ते अल्पमतातील सरकारचे निर्णय बदलले जातात. परंतु सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असेल तर त्यांनी घेतलेले निर्णय बदलले वा जनतेवर लादले जातात. हा आतापर्यतचा इतिहास आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नव्या मंत्रीमंडळाला नामांतर करण्याची संधी आणि बदलाचे श्रेय घेऊ दिलेले नाही,अशी सामाजिक कार्यकर्ते अनंत दाभोळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!