आरोग्य व शिक्षणक्राईम न्युज

लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीत गवळीवाडा येथील मारहाण प्रकरणी सात पर्यटकांवर गुन्हा दाखल.

लोणावळा शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार थर्टी फर्स्ट च्या राञी साडेनऊ वाजता गवळीवाडा येथील श्रीकृष्ण डेअरी समोर ही घटना घडली.

Spread the love

लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीत गवळीवाडा येथील मारहाण प्रकरणी सात पर्यटकांवर गुन्हा दाखल.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, २ जानेवारी, २०२३.

लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीत गवळीवाडा येथील तरूणांना बेदम मारहाण प्रकरणी सात पर्यटकांवर गुन्हा दाखल. करण्यात आला आहे.लोणावळा शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार थर्टी फर्स्ट च्या राञी साडेनऊ वाजता गवळीवाडा येथील श्रीकृष्ण डेअरी समोर ही घटना घडली.

फिर्यादी आतिश किसन गुप्ता ( वय- 33 वर्षे , व्यवसाय, रा. गवळीवाडा, लोणावळा, ता. मावळ जि.पुणे ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणावळा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
आरोपी१) दिलशाह हुसेन अहमद खान ( वय 26 वर्षे, रा. जय संतोशी मातानगर, होमगार्ड ट्रेनिंग सेंटर, घाटकोपर पश्चिम , मुंबई), २) फजलशहा फरियादअलीशहा,( वय २१ वर्षे, रा. अण्णा सागर, मोईली व्हिलेज, साकीनाका, मुंबई), ३) इम्रान महंमद इब्राहीम शेख ( वय -१९ वर्षे , रा. घाटकोपर मुंबई,), ४) मैफुस आलम कमालुद्दीन खान ( वय -२६ वर्षे, रा. असलफा गेट नं- ४, घाटकोपर रोड, पटेल वाडी चाळ, मुंबई ) ५) खालीद इस्माईल शेख( वय -२२, वर्षे , रा. जय संतोषीमाता नगर, होमगार्ड ट्रेनिंग सेंटर, घाटकोपर वेस्ट, मुंबई), ७) तुशार तात्याराव वाव्हाळे( वय -२१,वर्षे, रा. गौतमनगर, साकीविहार रोड, मुंबई -८७), ७) दिव्या कैलास यशवंते( वय -२०, वर्शे, रा. जुनीरा रमाबाई सहकार नगर, कामराज, घाटकोपर, मुंबई ) व इतर अज्ञात इसम यांनी
ता.३१ रोजी रात्री साडेनऊ वाजतेचे सुमारास श्रीकृष्णा डेअरीसमोर, गवळीवाडा, लोणावळा, ता. मावळ, जि पुणे येथे मारहाण केल्याची घटना घडली.

घडलेली घटना : – वर नमुद तारीख वेळी व ठिकाणी यातील खबर देणार यांनी खबर दिली की ,दि. ३१ रोजी रात्री ९.३० वाजताचे सुमारास श्रीकृष्णा डेअरीसमोर, गवळीवाडा, लोणावळा, ता. मावळ, जि पुणे येथे सात आरोपी व इतर अज्ञात व्यक्तींनी आम्हास शिवीगाळ, दमदाटी करून हाताने लाथाबुक्याने मारहाण करून माझे डावे हाताचे हाड मोडणेस कारणीभूत झाले. तसेच माझे मित्र धनंजय गवळी याचे पोटावर डावे बाजूस दुखापतीस व प्रणय गवळी याचे डावे हनुवटीवर, उजवे हाताचे अंगठयास दुखापतीस कारणीभूत झाले आहेत.

म्हणून त्यांचे विरूध्द कायदेशीर फिर्याद आहे,असे फिर्यादी आतिश गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहरचे पोलिसनिरिक्षक सिताराम डुबल यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सर्व सात आणि काही अज्ञात  अरोपींविरूध्दभा.द.वि.कलम.३२५,३२३,१४१,१४३,१४७,१४९,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.या गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा. ज्युडी. मँजि. सो। कोर्ट वडगांव मावळ यांना रवाना केला. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिसनिरिक्षक सीताराम डुबल यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिसनिरिक्षक एस.डी. बावकर तपास करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!