आरोग्य व शिक्षण

पुणे – लोणावळा दरम्यानच्या प्रत्येक रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार

डी आर यु सी सीच्या बैठकीत निर्णय

Spread the love

 

पुणे : येथील पुणे ते लोणावळा दरम्यान असणाऱ्या सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात  येणार आहे. पुणे लोणावळा दरम्यान चा रेल्वे स्थानकात सुधारणा करण्याचा निर्णय डी आर यु सी सी च्या बैठकीत घेण्यात आला.

चिंचवड रेल्वे स्थानकावर नवीन पादचारी पूल दोन ते तीन महिन्यात सुरू करण्यात येईल तसेच इलेक्ट्रॉनिक इंडिकेटर लावण्यात येतील. मळवली, कामशेट, कान्हे, वडगाव, घोरावाडी, कासारवाडी या ठिकाणी असणारे रेल्वे फाटक बंद करण्यात येणार असून या ठिकाणी वाहतुकीसाठी पूल बांधण्यात येणार आहे.

गुरुवार (ता. 23) रोजी डी आर एम कार्यालयात डी आर यु सी सी च्या झालेल्या बैठकीत विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी ही माहिती दिली.

निधीअभावी रेल्वेच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. या कामाला गती देण्यासाठी आमदार व खासदारांकडे पाठपुरावा करण्यात यावा. महिला सुरक्षा व वाढते अपघात या दृष्टिकोनातून रेल्वे सुरक्षा दलाचे मनुष्यबळ वाढविण्यात यावे. प्रवाशांची वाढती संख्या पाहून लांब पल्ल्याच्या गाड्यांना चिंचवड येथे थांबे देण्यात यावेत. जनरल तिकीट विक्री सुरू करावी. पॅसेंजर रेल्वे सुरू कराव्यात. तसेच दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना तिकीट देण्यात यावे अशा मागण्या रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या.

या बैठकीला वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, वरिष्ठ विभागीय परिचालक व्यवस्थापक डॉ. स्वप्नील, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष इक्बाल मुलानी, सदस्य बशीर सुतार, निखील काची, शिवनाथ बियाणी दिपाली धानोरकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!