क्रीडा व मनोरंजनमावळ

वाहनगाव येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न..

यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवाअंतर्गत आंदर मावळातील वडेश्वर केंद्राच्या केंद्रस्तरीय स्पर्धा वाहनगाव येथे उत्साहात पार पडल्या.

Spread the love

वाहनगाव येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न..Central level sports competition concluded with excitement at Vahangaon..

यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवाअंतर्गत आंदर मावळातील वडेश्वर केंद्राच्या केंद्रस्तरीय स्पर्धा वाहनगाव येथे उत्साहात पार पडल्या.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १३ डिसेंबर.

वाहनगाव येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या . यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवाअंतर्गत आंदर मावळातील वडेश्वर केंद्राच्या केंद्रस्तरीय स्पर्धा वाहनगाव येथे उत्साहात पार पडल्या.कुसवली पासून तर दवणेवाडी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आयडीयलया स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. धावणे, लांबउडी, उंचउडी, प्रश्नमंजुषा, लोकनृत्य, वक्तृत्व, खोखो, कबड्डी, गोळफेक, थाळीफेक इ.स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. या स्पर्धेत वाहनगाव व वडेश्वर येथील विदयार्थ्यांनी विशेष यश संपादन केले.

माऊ शाळेतील इ. पहिलीच्या ऋतुजा अंकुश या विद्यार्थिनीच्या मनोगताने सर्वांची मने जिंकली. स्पर्धेच्या उद्घाटनावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश वाडेकर, ग्रामपंचायत सदस्य जनाबाई कुडे, उपाध्यक्ष रेश्मा कुडे, केंद्रप्रमुख रघुनाथ मोरमारे, सदस्य उमेश कुडे, काळुराम वाडेकर, मा. तज्ञ संचालक चंद्रकांत निसाळ इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयीची माहिती व्याख्याते गंगासेन वाघमारे यांनी सांगितली. विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण व्हावी यासाठी भिमेश रोडगे यांनी क्रीडा प्रतिज्ञा घेतली. सर्वच विद्यार्थ्यांनी स्पर्धेत यश मिळवण्यासाठी अतोनात मेहनत घेतली.

स्पर्धेचे संयोजन वाहनगाव शाळेचे मुख्याध्यापक तानाजी शिंदे, रवींद्र माळी, काळू गुनाट यांनी तर सूत्रसंचालन हनुमंत धस यांनी केले. निकाल संकलनाची जबाबदारी कुंडलिक लोटे यांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!