क्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

लायन्स क्लब लोणावळा खंडाळा यांच्या वतीने बालग्राम मध्ये कार्यक्रम संपन्न.

Spread the love

लायन्स क्लब लोणावळा खंडाळा यांच्या वतीने बालग्राम मध्ये कार्यक्रम संपन्न.On behalf of Lions Club Lonavala Khandala program was concluded in Balagram.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २९ सप्टेंबर.

दिनांक २८ सप्टेंबर  रोजी लायन्स क्लब लोणावळा खंडाळा यांच्यावतीने संपर्कबाल अशा घर नांदगाव देवघर तालुका मुळशी येथे पितृ पंधरवड्यानिमित्त बालग्राम मधील सर्व बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

तसेच संस्थेतील मुलांसाठी ला. नंदकिशोरजी खंडेलवाल (राजाजी) यांच्यावतीने किराणा साहित्य, डॉ. सुहास गोसावी मनशक्ती केंद्र लोणावळा तसेच लायन डॉ. पी एम ओसवाल यांनी मुलांची आरोग्य तपासणी केली. टोनी लँड शॉप चेंबूर यांच्यावतीने संपर्क बाल आशा घर येथील मुलांसाठी तसेच संपर्क ग्रामीण विद्या विकास केंद्र भांबर्डे येथील मुलींसाठी कपडे, त्याचप्रमाणे अनिल भिलारे यांच्या वतीने संस्थेतील मुलांसाठी ब्लॅंकेट इत्यादी साहित्य भेट देण्यात आले.

या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून प्रमुख पाहुणे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, मावळ वार्ता फाउंडेशन चे अध्यक्ष नंदकुमार वाळंज (बाबूजी), माझी आदर्श सरपंच माननीय वत्सलाताई वाळंज, लायन ॲडवोकेट प्रफुल लुंकड अध्यक्ष लायन्स क्लब लोणावळा खंडाळा, आयन लायन देवेंद्र नालेकर माजी अध्यक्ष लायन्स क्लब लोणावळा खंडाळा, लायन विरल गाला सचिव लायन्स क्लब लोणावळा खंडाळा, लायन डॉ दिलीप सुराणा, लायन डॉ पोपट ओसवाल, लायन प्रकाश जैन खजिनदार लायन्स क्लब लोणावळा खंडाळा, लायन्स क्लब लोणावळा खंडाळाचे सदस्य मंगेश कदम, तसेच या कार्यक्रमाला मा. प्रकाश ढंभीरे, बी. एस. राजपूत , उत्तम रॉय,  दिनेश बॅनर्जी,  सविता शिंदे मॅडम,  स्वतंत्र कुमार ओसवाल,  शशिकांतजी खंडेलवाल सदर सदर कार्यक्रमासाठी लायन नंदकिशोरजी खंडेलवाल (राजाजी) यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले, तसेच सामाजिक कार्यकर्ते  अमर लोखंडे यांनी मान्यवरांचे आभार मानले. संपर्क बाला आशा घर परिवार कर्मचारी वृंद यांच्या वतीने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!