आरोग्य व शिक्षणक्राईम न्युज

बेकायदा शस्ञ बाळगणारा व पुरवठा करणाऱ्या दोघाजणांना ग्रामिण पोलिसांनी केले गजाआड

Spread the love

लोणावळा : बेकायदा शस्ञ बाळगणारा व पुरवठा करणाऱ्या दोघांना ग्रामिणचे पोलिसांकडून गजाआड करण्यात आले आहे.३१ डिसेंबर व नववर्षाचे पूर्वसंध्येला कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणावळा ग्रामिण पोलिसांनी पोलिस ठाण्याचे कार्यक्षेञात बेकायदा शस्ञ बाळगणा-या आरोपीचा शोध व माहिती घेण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे.

मळवलीजवळ देवले येथे एका आरोपीस विनापरवाना एक गावठी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूसासह अटक केली आहे. त्यास पिस्तूल देणाऱ्यासही पोलिसांनी अटक केली आहे.

प्रशांत शांताराम आंबेकर ( रा.देवले , ता.मावळ ) असे विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आनिकेत अशोक कालेकर ( रा . काले,पवनानगर,ता.मावळ) असे पिस्तूल पुरवठा करणाऱ्याचे नाव आहे.

लोणावळा ग्रामिण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मळवली व देवले परिसरात एक तरूण विनापरवाना अग्निशस्ञ (पिस्तूल ) बाळगत संशयास्पद फिरत असल्याची माहिती ग्रामिण पोलिसांना एका गुप्त खब-याकडून मिळाली. त्यानुसार पुणे ग्रामिणचे पोलिस अधिक्षक डा.अभिनव देशमुख ,अप्पर पोलिस अधिक्षक मितेश गिट्टे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व लोणावळा ग्रामिणचे पोलिसनिरिक्षक प्रविण मोरे यांनी सापळा लावला.

यावेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन बनकर , आनिल लवटे, पोलिस कर्मचारी शांताराम बोकड, अमित ठोसर, विजय गाले, शकील शेख, गणेश होळकर ,शरद जाधवर, किशोर पवार,सिध्देश शिंदे यांनी मळवली देवले रोडवर सापळा लावून प्रशांत आंबेकर यास ताब्यात घेतले व त्याची आंगझडती घेतली असता त्याने आनिकेत अशोक कालेकर याने हे पिस्तूल दिल्याचे सांगितले . पोलिसांनी अनिकेत कालेकर यास ताब्यात घेतले व त्यास तात्काळ अटक केली.

या प्रकरणी दोघांच्या विरोधात बेकायदा आग्निअस्ञ बाळगणे व पुरवठा करणे असा महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३५ भा .द.वि कलम ३४ व अग्निशस्ञ कायदा कलम ३( २५ ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यांना वडगा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ता.१ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामिण पोलिस स्टेशनचे फौजदार सचिन बनकर करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!