पाणी व्यवस्था सुरळीत करा अन्यथा आंदोलन करणार.दिनेश गवई. वंचित बहुजन आघाडी तळेगाव शहराध्यक्ष. Make the water system smooth or else we will protest.Dinesh Gavai. Vanchit Bahujan Aghadi Talegaon City President.
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १५ जानेवारी.
तळेगाव स्टेशन विभागांमध्ये पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असून पाणी प्रश्न सुरळीत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तळेगाव शहराध्यक्ष दिनेश गवई यांच्या नेतृत्वाखाली तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांना निवेदन देण्यात आले, तळेगाव स्टेशन विभागातील पाण्याचा प्रश्न त्वरित सोडवावा अन्यथा वंचित बहुजन आघाडी आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
शहरातील विविध प्रश्नांवर मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष होत असून पाणीपुरवठा सारख्या मूलभूत गोष्टींसाठी सुद्धा नागरिकांना नगरपरिषदेमध्ये खेटे मारायला लागत आहेत ही खेदजनक बाब असल्याचे दिनेश गवई यांनी नमूद केले आहे.