आरोग्य व शिक्षण

चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये  मकर संक्रांती उत्साहात साजरी

Spread the love

इंदोरी : येथील चैतन्य  चॕरिटेबल फाउंडेशन संचलित चैतन्य  इंटरनॅशनल स्कूलमध्ये दि.13 जानेवारी रोजी  भारतीय संस्कृतीच्या मूल्यांची जोपासना करीत मकर संक्राती  साजरी  करण्यात आली . या ऑनलाईन कार्यक्रमाच्या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य  उपस्थित होते.

 


या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या सहशिक्षिका सौ.प्रज्ञा आहेर यांनी तिळगुळाचे महत्व, आपुलकी, प्रेम उत्साह वाढवणारा तसेच स्व:ता बरोबर समाजाचे कल्याण करणाऱ्या सणा विषयी त्यांनी माहिती सांगितली.

अविनाश गोडसे याने मकरसंक्रांति वर सुविचार सादर केला. संयोगिता गोडसे हिने मकरसंक्रांतीच्या दिवशी करण्यात येणाऱ्या कृती चे महत्व आपल्या भाषणातून पटवून दिले.  सिद्धांत बडे याने मकर संक्रांतीच्या शुभेच्छा कवितेतून व्यक्त केल्या. शुभम शेजाळ याने मकर संक्रातीचा सण इतर सणां पेक्षा कसा वेगळा आहे व पूर्ण भारतभर हा सण कसा साजरा होतो हे सांगितले .

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती हेमलता खेडकर मॅडम यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा  दिल्या. व आपण सण साजरे का करतो ?त्यामागील वैज्ञानिक कारण कोणते आहे? याबद्दलची माहिती देऊन सणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वाणाचे महत्व कथेतून विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पतंग बनवून सणाचा आनंद घेतला.

या कार्यक्रमास विद्यार्थी पालक वर्गाने उस्फुर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, अध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!