राजकीय

वरवडे विविध विकास कार्यकारी सोसायटीव‌र शिवसेनेचे वर्चस्व-अध्यक्षपदी हेमंत सुर्वे तर उपाध्यक्ष महेश विचारे बिनविरोध

Spread the love

जाकादेवी/वार्ताहर

रत्नागिरी तालुक्यातील वरवडे विविध विकास सहकारी सोसायटी वरवडे यांची बिनविरोध निवडणूक नुकतीच संपन्न झाली.या सोसायटीवर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.बरा पैकी अकरा जागा शिसेनेने आपल्याकडे ठेवल्या.
शिवसेनेचे उमेदवार विजयासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत आणि तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगपती विष्णू पवार, विभाग प्रमुख बाबय कल्याणकर , माजी समाजकल्याण सभापती व विद्यमान जि.प.सदस्या सौ.ऋतुजा जाधव,सरपंच विराग पारकर,खाडे, गजानन हेदवकर,राहुल विचारे शाखाप्रमुख,रवी खेडेकर,हेमंत सुर्वे,सुरेश पोवार,निमा विचारे, महिला विभाग प्रमुख, सौ.माचिवले सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य,सेनेचे सर्व पदाधिकारी यांनी अधिक मेहनत घेतली
या सोसायटीच्या चेअरमनपदी धडाडीचे कार्यकर्ते हेमंत सुर्वे तर उपाध्यक्ष महेश विचारे यांची बिनविरोध निवड झाली. सर्व विजयी उमेदवारांचे वाटद विभागीय कार्यालयात गटामार्फत भव्य सत्कार करण्यात आला.यामध्ये सोसायटीचे नुतन अध्यक्ष हेमंत सुर्वे, उपाध्यक्ष महेश विचारे, सागर माचिवले, अनंत गुरव,अविनाश पारकर, राहूल पारकर, ज्ञानेश्वर आंबेरकर, नंदादीप जाधव,अशोक खरात, वर्षा पारकर ,नम्रता पाटील इत्यादींचा समावेश होता.
या कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख बाबय कल्याणकर, तालुका संघटक शरद चव्हाण, पंचायत समिती सभापती सौ.संजना माने,एकनाथ धनावडे,उदय माने, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव,अनिकेत सुर्वे,भाई जाधव,बापू घोसाळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनिल भोजे,सुवेश चव्हाण,गणेश वाडकर इत्यादी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!