आरोग्य व शिक्षण

लोणावळा नगरपरिषदेने देशात दुसरा क्रमांक मिळवून महाराष्ट्र राज्याचे नाव राखले – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Spread the love

लोणावळा :  लोणावळा नगरपरिषदेने देशात दुसरा क्रमांक मिळवून महाराष्ट्र राज्याचे नाव राखले. चौथ्यांदा देशपातळीवर लोणावळा नगरपरिषदेच्यावतीने क्रमांक मिळविला याचा मला अभिमान आहे.सर्व लोणावळेकर तसेच नगराध्यक्षा आणि सर्व टीमचे अभिनंदन अश्या शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी नगरपरिषदेचे कौतुक केले.

मी मुख्यमंत्री असताना निवडणुकीनंतर येथे आलो असता राज्यमंञी बाळाभाऊ भेगडे यांचेकडून आम्ही शंभर कोटीचा निधी नगरपरिषदेचे विकास कामाकरीता दिला. शहराचे चिञ बदलण्यासाठी अश्वासन दिलेले पाळले. शहरे स्वच्छ असायला हवीत, पर्यावरण पूरक तसेच सुंदर कशी होतील,तसेच निसर्गाने दिलेय ते टिकवून ठेवण्यासाठी लक्ष देणे महत्त्वाचे आहे, असे राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिपादन केले.

लोणावळा नगरपरिषदेच्या सुमारे ३२ कोटी जलशुध्दीकरण प्रकल्प , आठ कोटीच्या स्मशानभूमिचे बांधकाम आणि सुमारे दोन कोटीच्या चार राष्ट्रपुरूषांचे पुतळ्यांचे सुशोभिकरणाचे कामांचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

फडणवीस पुढे म्हणाले , सुमारे शंभर कोटी निधी आम्ही व बाळाभाऊ राज्यमंञी असताना दिला , त्याचे नगरपरिषदेच्या माध्यमातून शहर बदलून आज वेगळे दिसत आहे.फिल्टर पाणी नगरपरिषदेचे बाटलीत भरावे असे ते स्वच्छ आहे. कचराडेपो शास्ञशुध्द व्यवस्थापन केल्याने येथे सुरेखाताई यांनी हळदीकुंकू कार्यक्रम घेतला.स्मशानभूमिचे उद्घाटनासाठी मी गेलो असता ;नागपूरच्या महापौरपदावेळी काय अनुभव आला , तसे काही घडले नाही. तिथे मला एका प्रेताला आग्नि द्यायला विरोधकांनी लावले होते.येथे सुसज्ज स्मशानभूमि आहे.दुःखाचे वातावरणात फुंकर घालण्यासाठी सुंदर जागा बांधली आहे. भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर , महात्मा गांधी , क्रांतीसूर्य महात्मा फुले तसेच संत गाडगेमहाराज या थोर पुरूषांच्या पुतळ्यांचे आनावणाचे मला भाग्य लाभले आहे .चौकट तांत्रिक कारण व मनुष्यबळ अभावामुळे साहित्य प्रकाशित करण्यासाठी आलेले नऊ कोटी पडून आहेत. आघाडी सरकार ने लक्ष घालावे , असे फडणवीस म्हणाले.

 

यावेळी माजी राज्यमंञी बाळाभाऊ भेगडे म्हणाले , सुमारे तीनशे कोटीची कामे ग्रामिण भागात चालू आहेत. लोणावळ्याच्या विकासाला सुमारे शंभर कोटी निधी केंद्र व राज्यात सत्ता असल्यामुळे देता आला. ३२ कोटी फिल्टर पाणी योजनेच्या कामासाठी दिले. स्मशानभूमिचे कामाकरीता आठ कोटी दिले. आम्हाला मंञालयात भेटायला प्रमोदभाऊ व राजाभाऊ आले होते. आम्ही बोटींग साठी , तसेच विकासाच्या कामाकरीता जी आर त्यांना वाशीच्यापुढे येत नाही तर आम्ही मंञालयातून पाठवला. इंदोरी ला ५५ कोटी , हिंजवडीसाठी ७० कोटी , तळेगाव नगरपरिषदेच्या साठी पावणेदोन कोटी , भंडारा डोंगर विकासाच्या कामाकरीता २०० कोटी निधी दिला.मावळावर प्रेम करणारे नेते माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस आहेत. नवलाख उंबरेतील ७०० एकर जमिनीवर असलेले शिक्के काढण्याचे काम देवेंद्रभाऊ यांनी केले. जाधववाडीत १३५० हेक्टर जमिन परत मिळवण्यासाठी देवेंद्रभाऊ यांनी प्रयत्न केले.

यावेळी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव म्हणाल्या , मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस असताना व राज्यमंञी बाळाभाऊ भेगडे आसताना लोणावळ्याचे विकासाच्या कामाकरीता शंभर कोटी निधी दिला. स्मशानभूमिचे कामाला ८ कोटी तर जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी ३२ कोटी दिले. रस्त्याच्या कामाकरीता १० कोटी दिले. कचराडेपो करीता १० कोटी निधी दिला. दलीत वस्तीला निधी दिला.पंचवीस वर्षात दिला नाही इतका निधी पाच वर्षात देवेंद्रभाऊ यांनी बाळाभाऊ भेगडे यांचे मार्फत दिला. राजमाची कडे सात किलोमीटर रोप वे झाल्यास लोणावळा शहर देशात वेगळ्या उंचीवर पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाईल. आमची सत्ता आल्यावर औंधच्या उपजिल्हा रूग्णलयाचे धर्तीवर रूग्णालयाचे कामासाठी बाळाभाऊ भेगडे यांनी शंभर बेडचे रूग्णालय मंजूर करून आणले.ते जिल्ह्यास वर्ग करण्यात आल्याने परवा त्याचे भूमिपूजन झाले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे , तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे , लोणावळ्याचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, उपनगराध्यक्ष दिलीपशेठ दामोदरे, आर पी आय जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे , बांधकाम सभापती पूजा गायकवाड , आरोग्य समिती सभापती रचना सिनकर , तसेच नगरसेवक राजूशेठ बच्चे, श्रीधर पुजारी , देविदास कडू, ललीत सिसोदिया , सुधीर शिर्के , नगरसेविका सुवर्णा अकोलकर ,, बिंद्रा गणाञा, संध्या खंडेलवाल , जयश्री आहेर, मंदा सोनवणे, माजी नगरसेविका यमुनाताई साळवे, तसेच आर पी आय शहराध्यक्ष कमलशील म्हस्के , भाजपचे शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल आदी उपस्थित होते.

यावेळी लायन्स क्लबच्या आध्यक्षा सौ.खंडेलवाल यांचा , शिवदुर्ग मिञचे सुनिल गायकवाड , नगरसेवक नितीन आगरवाल , तसेच सिंधुदुर्गचे माजी आमदार प्रमोद जठार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी शिक्षण मंडळ सभापती विनय विद्वांस , माजी नगराध्यक्ष व आरपीआय जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. जलशुध्दीकरण प्रकल्पाचे ठेकेदार आणि राष्ट्रपुरूषांचे पुतळे बसविणारे ठेकेदार यांचा सत्कार करण्यात आला . प्रास्तविक नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांनी केले. . सूञसंचालन सामाजिक कार्यकर्ते आरविंद कुलकर्णी व मुख्याध्यापक राजेंद्र दिवेकर यांनी केले. आभार उपनगराध्यक्ष दिलीपशेठ दामोदरे यांनी मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!