आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

मध केंद्र योजनेआंतर्गत मधमाशी पालन जनजागृती व शेतकरी मेळावा संपन्न..

महात्मा फुले कृषि विद्यापीठ यांचे संशोधनामुळे आज या भाताचे वाण टिकून आहे.पद्माकर देसाई

Spread the love

मध केंद्र योजनेआंतर्गत मधमाशी पालन जनजागृती व शेतकरी मेळावा संपन्न.
आवाज न्यूज:  लोणावळा ता.१०(प्रतिनिधी ) मध केंद्र योजनेआंतर्गत मधमाशी पालन जनजागृती व शेतकरी मेळावा शेतकरी व महिला बचत गटाचे उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. भात संशोधन केंद्रातील भात कीड रोग संशोधन अधिकारी किरण रघुवंशी म्हणाले ” इंद्रायणी भात या भागात सर्व रोगावर मात करणारे आहे . महात्मा फुले कृषि विद्यापीठ यांचे संशोधनामुळे आज या भाताचे वाण टिकून आहे. शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादन घ्यावे ,असे ते पुढे म्हणाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उद्योगमंञी सुभाष देसाई यांचे निकटचे अधिकारी पद्माकर देसाई उपस्थित होते.
यावेळी उपजिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी अमर राऊत , यांनी मधुमक्षिका पालन केल्यास परागीभवन होऊन भातपिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होते.
जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी श्री.बनसोड म्हणाले ” काही दिवसांमधे आदीवासी , कातकरी या समाजासाठी प्रशिक्षण मेळावा मोफत घेणार आहे.त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.
ते पुढे म्हणाले” खादी ग्रोद्योग चे माध्यमातून विविध लघुद्योग , कर्ज योजना राबविण्यात येईल.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष दिपकशेठ हुलावळे , माजी सरपंच भरत येवले , खरेदी विक्री संघ माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे , माजी सरपंच व शेतकरी शास्ञज्ञ मंच अध्यक्ष नंदकुमार पदमुले , माजी चेअरमन गुलाब तिकोणे , भाजे विकास सोसायटी चेअरमन बाळासाहेब आंबेकर , रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी एकनाथ शिर्के , प्रगतीशील शेतकरी अनिल गरवड ,अनिल भगत, अमोल केदारी , दत्ताञेय ढाकोळ , नितीन विकारी , वाकसई देवघर चे सरपंच दिपक काशिकर , कार्यकते व सदस्य सागर जाधव आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूञसंचालन नंदकुमार पदमुले यांनी केले. आभार देवलेचे सरपंच महेंद्र आंबेकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!