आरोग्य व शिक्षणक्राईम न्युज

पुण्यात तरुणाचा तलवारीने निर्घृण खून

Spread the love

पुणे : कोथरूड येथील उच्चभ्रू परिसरात तरुणाचा भरदिवसा तलवारीने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे.

अनिल राजेंद्र जाधव ( वय 21 रा. डहाणूकर कॉलनी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अनिल जाधव यांचा विवाह ठरला होता. त्याच्या टिळ्याचा  कार्यक्रम रात्री होता. त्याची बहीण डहाणूकर कॉलनी येथील लक्ष्मीनगर येथे राहात होती. बहिणीला सोडण्यासाठी तो लक्ष्मीनगर येथे आला होता. बहिणीला सोडून दुचाकीने जात असताना पोतनीस परिसरात पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. ही घटना सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवारीने सपासप वार केले. भररस्त्यात झालेल्या हल्ल्यात रक्तस्राव झाल्याने अनिल याचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर पसार होतात नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर अलंकार पोलिस व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!