कृषीवार्ता

कोल्हापूर येथे दि. ११ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत “कोल्हापूर द्राक्ष महोत्सव – २०२२” चे आयोजन

Spread the love

कोल्हापूर द्राक्ष महोत्सव २०२२” उद्घाटन

मागील वर्षी कोल्हापूर द्राक्ष महोत्सव २०२१ चे आयोजन करणेत आलेले होते. करवीर नगरीतील ग्राहकांनी सदर महोत्सवास उस्फुर्त प्रतिसाद दिलेला होता. चालु वर्षी सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांसाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने “ शेतकरी ते ग्राहक थेट विक्री” योजने अंतर्गत कोल्हापूर शहरातील ग्राहकांना उत्तम प्रतीची, ताजी द्राक्ष माफक दरात उपलब्ध व्हावी, म्हणुन शाहु स्मारक हॉल, दसरा चौक, कोल्हापूर येथे दि. ११ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत “कोल्हापूर द्राक्ष महोत्सव – २०२२” चे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, दि. ११/०२/२०२२ रोजी सकाळी १०.३० वा. मा. श्री. राहुल रेखावार, (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या शुभहस्ते व कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगलीचे सभापती, श्री. दिनकर पाटील, बाजार समिती सांगलीचे इतर संचालक, तसेच मा. श्री. दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापुर, मा. श्री. अरुण काकडे, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर, मा. श्री. बी. जी. बिराजदार, विभागीय कृषि सहसंचालक, कोल्हापूर, मा. श्री. अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर व मा. श्री. ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कोल्हापूर तथा प्रकल्प संचालक, आत्मा, कोल्हापूर, डॉ. सुभाष घुले, उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कोल्हापूर व श्री. महेश चव्हाण, सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

सदर द्राक्ष महोत्सवामध्ये कोल्हापूरकरांना अनुष्का, ज्योती, रेडग्लोब, सुपर सोनाक्का, माणिकचमण, कृष्णा सिडलेस, आर. के. सुपर, शरद सिडलेस इ. जातींच्या द्राक्षांची चव चाखायला मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!