क्रीडा व मनोरंजनमावळ

कलापिनी आयोजित एकपात्री व नाट्यछटा स्पर्धा उत्साहात संपन्न…

कलापिनी तर्फे एकपात्री व नाट्यछटा स्पर्धेत १६५ स्पर्धकांचा सहभाग होता.

Spread the love

कलापिनी आयोजित एकपात्री व नाट्यछटा स्पर्धा उत्साहात संपन्न…Kalapini monologue and drama competition concluded with excitement…कलापिनी तर्फे एकपात्री व नाट्यछटा स्पर्धेत १६५ स्पर्धकांचा सहभाग होता.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर १४ डिसेंबर.

कलापिनी आयोजित एकपात्री व नाट्यछटा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.कलापिनी तर्फे एकपात्री व नाट्यछटा स्पर्धा घेण्यात आल्या. १६५ स्पर्धकांचा सहभाग होता.शिशुगट व बालगट व शालेय अशा ५ गटांमध्येशिशुगट ते तिसरी चौथी या गटाचे परीक्षण रश्मी थोरात व अरुंधती देशपांडे यांनी केले.पाचवी ते दहावी या गटांचे परीक्षण वैभवी तेंडुलकर व केतकी लिमये यांनी केले.स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.या समारंभाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक चंद्रकांत भिडे हे होते.प्रमुख पाहुणे अॅटम चे सर्वे सर्वा उदय पाटील व  मकरंद जोशी (कलापिनीचे जेष्ठ कलाकार व रिन्यू हायड्रो इलेक्ट्रिकल “कंपनीचे “व्हाईस प्रेसिडेंट) हे होते.

कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी सर्वांचे स्वागत केले. कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन मेधा रानडे यांनी केले. चंद्रकांत भिडे व उदय पाटील यांनी कलापिनी संस्था व स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.

” मी कलापिनीच्या या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेत सर्व नवीन गोष्टी शिकत मोठा झालो. आता त्याचा मला खूप उपयोग होत आहे. आणि या सगळ्यांमध्ये टीम वर्क किती महत्त्वाचे असते, तेही समजले” असे मनोगत  मकरंद जोशी यांनी व्यक्त केले. “रिन्यू हाय ड्रो इलेक्ट्रिकल “कंपनीचे “व्हाईस प्रेसिडेंट” झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
“सर्व स्पर्धकांनी स्पष्ट उच्चार, उत्कृष्ट पाठांतर आणि न घाबरता नाट्यछटा सादर केल्या असे स्पर्धकांचे कौतुक करीत तसेच पालकांनी मुलांच्या वयाला योग्य अशा नाट्यछटा स्वतः लिहा” असे आपल्या मनोगतात परीक्षक वैभवी तेंडुलकर यांनी व्यक्त केले.

“नाटकाचा विषय निवडताना मुलांच्या वयाचा जरूर विचार करावा,” अशी महत्त्वाची सूचना परीक्षक रश्मी थोरात यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केली.
सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले व कलापिनीच्या श्लोकाने कार्यक्रमाची सांगता झाली.
स्पर्धा प्रमुख अशोक बकरे व कलापिनी कार्याध्यक्ष अंजली सहस्त्रबुद्धे यांनी स्पर्धेचे नियोजन केले होते
आणि कलापिनीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण झाली.
कलापिनी बाल भवन कुमार भवन च्या अनेक विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये पारितोषिके मिळाली.
आणि कलापिनी बालभवन व कुमार भवन मध्ये विद्यार्थी आले तर त्याचा फायदा त्यांना नक्की होतो हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचला.अतिशय खेळीमेळीच्या उत्साह पूर्ण वातावरणात स्पर्धा संपन्न झाली.

कलापिनी एकपात्री व नाट्यछटा स्पर्धा २०२३. (वर्ष २६वे) निकाल पत्र :
बालवाडी गट:-
प्रथम- -हीदीषा मंदार महाजन,
किडझी.

द्वितीय -इरा विजय कुलकर्णी,
ज्युनिअर केजी, बालविकास
तृतीय -आदित्य महेश कुलकर्णी,
मोठा गट, पैसाफंड (अ)
१ली,२री गट
प्रथम – ओवी सुचित आल्हाट,इ.२री.
जैन इंग्लिश स्कुल
द्वितीय – प्रत्युषा अमोल नवले,
पैसा फंड प्राथमिक शाळा
तृतीय – इरा कर्पे, २री, सरस्वती
विद्या मंदिर.
३री, ४थी गट.
प्रथम- आद्या गणेश काशिद,
३री, माउंट सेंट इं.स्कूल
द्वितीय -सृजा सुबोध खरे, ३री,
जैन इं. स्कूल.
तृतीय -ऋतू निखिल वाबळे,
४थी, डी.वाय.पाटील
हायस्कूल, आंबील
५वी ते ७वी गट.
प्रथम – स्वरा नितीन माळी, ५वी
सरस्वती विद्या मंदिर.
द्वितीय -ऋग्वेद आरण्यकए, ७वी
सह्याद्री इं. स्कूल.
तृतीय – शांभवी सत्येन जाधव,
७वी, मामासाहेब खांडगे
हायस्कूल.
८वी ते १०वी गट:-
प्रथम -श्रीमय अमित कुलकर्णी,
८वी, जैन इं. स्कूल
द्वितीय -संस्कृती साबळे, ९वी,
हायव्हिजन इंटरनॅशनल स्कूल
तृतीय -श्रावणी बाप्पा होळकर,
८वी, ॲड.पु.वा. परांजपे वि.मं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!