कृषीवार्ता

आधुनिक तंत्रज्ञानाने ओल्या दुष्काळात सुद्धा तुरीचे बहारदार पिक

Spread the love

नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्यामार्फततुर पिक प्रात्यक्षिक नितीन देशमुख यांच्या शेतावर घेण्यात आला
यामध्ये कृषी सहाय्यक बालाजी अवचार व संदीप गायकवाड यांनी नवीन तंत्रज्ञानाची माहिती देऊनउत्कृष्ट पीक उभे करण्यात यश मिळवले आहे या प्रात्यक्षिक प्रयोगाची पाहणी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केली देशमुख यांच्या शेतावर तुर व सोयाबीन आंतरपीक घेण्यात आले आहे तसेच रुंद वरंबासरी पद्धतीचा अवलंब करून टोकन पद्धतीने लागवड करण्यात आली आहे या पद्धतीमुळे बियाणे व खताच्या खर्चात बचत झाली आहे आज प्राप्त स्थितीमध्ये सोयाबीन काही प्रमाणात सडले असले तरी तुरीच्या पिकाला काहीही धोका झालेला नसून तुरीचे बहारदार पीक उभे आहे याप्रसंगी शेतकऱ्यांना डॉक्टर यांनी नवीन तंत्रज्ञाना संदर्भात माहिती दिली व शेतकरी पांडुरंग नवथर नितीन देशमुख दीपक निकम अजय हाडोळे युवक कार्यकर्ते नवनाथ साळुंखे अमोल देशमुख सुरेश लंगे प्रमोद देशमुख सचिन निकम प्रगतशील शेतकरी जगन्नाथ देशमुख सुधाकर देशमुख नवनाथ पोटे गणेश खजिनकर ज्ञानदेव गांगर्डे संदीप देशमुख व शिरसगावयेथील शेतकऱ्यांची उपस्थिती चांगली होती शेतकऱ्यांनी ओला दुष्काळावर मात करून तुरीचे बहारदार पीक घेतल्याबद्दल कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर ढगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!