देश विदेश

स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांचे कार्य प्रेरणादायी: डॉ.मच्छिंद्र सकटे

Spread the love

कोकरुड/ वार्ताहर
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांचे कार्य प्रेरणादायी आहे.असे प्रतिपादन दलित महासंघाचे संस्थापक मच्छिंद्र सकटे यांनी केले.ते बिळाशी ता शिराळा येथे दलित महासंघाची ऐतिहासिक तिरंगा यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
यावेळी माजी सभापती रविंद्रकाका बडेॅ, युवा नेते सम्राट महाडिक, यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना सकटे म्हणाले की, इंग्रजांच्या जुलमी सत्तेपासून १५ आँगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. आणि परकीयांच्या गुलामगिरीतून ‘भारत’ देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताला ७५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने ‘स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी’ वर्ष साजरे करत असताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी
ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले त्या शुरविर भुमिपुत्र हुतात्म्यांना अभिवादन करणे गरजेचे आहे. १९३० साली याच बिळाशी गावाने बंड करून जंगल सत्याग्रह केला होता.यामध्ये महीलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.त्यांचे शौर्य , पराक्रमाची आठवण कायम चिरंतन ठेवण्यासाठी दलित महासंघाच्या वतीने ऐतिहासिक तिरंगा यात्रेचा प्रारंभ केला आहे.प्रारंभी बिळाशीच्या स्मारकामध्ये स्वातंत्रसैनिक इंदुबाई दत्तात्रय लोहार, हिराबाई गोविंद पाटील यांच्या हस्ते हुतात्म्यांना पुष्फचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी माजी उपसभापती आनंदराव पाटील,प्रकाश धस, नगरसेवक केदार नलवडे,पुष्पलता संकटे, सरपंच कल्पना यमगर, उपसरपंच दत्तात्रय मगदुम, माजी सरपंच विश्वास पाटील,बी.एम.पाटील, बाजीराव पाटील,एस.वाय.यमगर, डॉ.एन.के.पाटील,बाबासो परिट, अशोक लोहार, विलास रोकडे,विजय रोकडे, विजय साळुंखे, आनंदा पाटील,विलास बल्लाळ, संतोष चांदणे, बळीराम रणदिवे, शंकर महापुरे, मनिषा महापुरे,सिमाताई आवळे, आदींसह बिळाशी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी : तिरंगा यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ.मच्छिंद्र सकटे व व्यासपीठावर अण्य प्रमुख मान्यवर.( छाया प्रतापराव शिंदे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!