सौ.सुनिता लक्ष्मण कातकर यांची आंतरराष्ट्रीय एम.डी.आर.टी.संस्थेच्या वतीने अमेरिका-बोस्टन येथे कॉन्फरन्ससाठी निवड
सौ.सुनिता लक्ष्मण कातकर यांची आंतरराष्ट्रीय एम.डी.आर.टी.संस्थेच्या वतीने अमेरिका-बोस्टन येथे कॉन्फरन्ससाठी निवड
अमेरिका -बोस्टन येथे २२,२३,२४ जून २०२२ रोजी ही कॉन्फरन्स संपन्न होणार आहे. भारत सरकारचा प्रतिनिधी (एल.आय.सी.ऑफ इंडिया ) यांच्यावतीने त्या तेथे उपस्थित राहणार आहेत तेथे जगभरातील टॉपचे एल.आय.सी.एजंट येथे उपस्थित राहणार आहेत. यावेळी इन्शुरन्स सेक्टरवर सखोल चर्चा विनिमय करण्यात येणार आहे.
सन १९९४ पासुन म्हणजेच गेली २७ वर्षे अत्यंत निष्ठेने सौ.कातकर या कार्यरत आहेत.त्यांची रत्नागिरी शाखेतीतून ही निवड करण्यात आली. रत्नागिरी, कोल्हापूर व सांगली या विभागातुन त्या कार्यरत आहेत. त्यांची ही सलग तिस-यांदा निवड झाली आहे.
त्यांना मार्गदर्शन सी.पी.पटवर्धन ,डेव्हलपमेंट ऑफीसर रत्नागिरी, श्री चौधरी उपशाखाधिकारी रत्नागिरी, श्री प्रशांत कुलकर्णी उपशाखाधिकारी रत्नागिरी, श्री हेमंत जोशी शाखाधिकारी रत्नागिरी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.२००३ पासून सतत शतकवीर हा बहुमान प्राप्त केला आहे. ऑल इंडिया चेअरमन क्लबचे २०१० पासून सदस्य आहेत.सर्व विमेधारकांचे उत्तम सहकार्य मिळाल्याबद्दल त्यांचेही आभार मानले.त्यांचे पती श्री लक्ष्मण कातकर सर यांचे सर्वोत्तम सहकार्य लाभले.त्यांच्या या निवडीबद्दल संपूर्ण जिल्हाभरातून अभिनंदन करण्यात आले.