कृषीवार्ता

उन्हाळी सोयाबीन काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग

Spread the love

नेवासा मागील वर्षी पाऊस मान चांगले झाल्यामुळे उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती आताकाढणी हंगाम सुरू झाला आहे त्यासाठी कृषी खात्यामार्फत शेतकऱ्यांना शेतात जाऊन मार्गदर्शन करण्यात आले कृषी शास्त्रज्ञ डॉ अशोकराव ढगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सोयाबीन ची पाने पिवळी झाली व शेंगा पक्व झाल्यानंतर साधारणपणे पेरणीनंतर 90 दिवसांनी सोयाबीनची काढणी करावी यावर्षी मान्सून हंगाम व पाऊस लवकर येत असल्यामुळे 25 ते 31 मे पर्यंत शेतकऱ्यांनी सोयाबीन कापणी करावी मंडल कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुड के यांनी शेतावर जाऊन शास्त्रज्ञ समवेत पाहणी केली सर्वसाधारणपणे सोयाबीन ची वाढ व पीक परिस्थिती आज समाधान कारक आहे बकू पिंपळगाव येथील शिवाजीराव मते यांनी सोयाबीनचे उत्कृष्ट पीक घेतले असून विक्रमी उत्पादन येईल त्याची पाहणी प्रगतशील शेतकरी संभाजीराव कुताळ डॉक्टर ढगे व कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!