कृषीवार्ता

अमर पवार यांनी एक एकर शेतात तब्बल १०४ टन उसाचे उत्पादन

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. ८ (प्रतिनिधी)

सर्वसाधारणपणे शेतकरी याअमर पवार यांनी एक एकर शेतात तब्बल १०४ टन उसाचे उत्पादन घेतले. परिसरात एकरी सरासरी ७० ते ७५ टन उसाचे उत्पादन घेतले जाते. पण या सरासरीच्या गणिताला बगल देत चिंचोली भुयार, (ता. उमरगा) येथील प्रयोगशील शेतकरी अमर पवार यांनी एक एकर शेतात तब्बल १०४ टन उसाचे उत्पादन घेतले. पवार यांना वडिलोपार्जित २० एकर शेती असून शेतीकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी वकीली व्यवसायाला राम-राम ठोकत शेती व्यवसाय करण्याचा चंग बांधला. या वर्षी साखर कारखान्याचे बायलर पेटल्यानंतर ऊसतोड सुरु झाली आणि पवार यांनी एकरी १०४ टन ऊस उत्पादन काढले आहे. उस्मानाबाद जिल्हात सरासरी एकरी ७० ते ७५ टन ऊस उत्पादन काढले जाते. पवार यांनी सरासरी पेक्षा अधिक उत्पादन घेत शंभरी आकडा पार केल्याने शेतकऱ्यांत चर्चा चालू आहे. जेमतेम रासायनिक खत व सेंद्रिय खताचे मिश्रण करून व ऊसातील तण काढण्यात सातत्य ठेवल्याचे गमक असल्याचे पवार यांनी सांगितले. ऊसाला ड्रीपच्या तूटलेल्या नळीचे तोटा बनवून तोट्याच्या सहाय्याने पाणी देण्यात आले आहे. यामुळे योग्य प्रमाणात पाणी पोहचले व श्रम देखील कमी लागले. सन २००० मध्ये शेतकरी अमर पवार यांनी एल.एल.बी. चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ वकीली व्यवसाय केला. काही कारणाने विधी व्यवसायातील आवड कमी झाल्याने ते शेती व्यवसायाकडे वळून अभ्यासपूर्ण शेती व्यवसाय करण्याचा निश्चय केला. फोटो ओळ : भुयार चिंचोली, ता. उमरगा येथील अमर पवार यांच्या शेतातील उसाचे क्षेत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!