देश विदेश

नंदूरबार जिल्हाचे पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी रेखाटले शिवरायांचे नितांत सुंदर चित्र

Spread the love

नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील (IPS) हे एक हरहुन्नरी, कर्तव्यदक्ष व संवेदशील मनाचे पोलीस अधिकारी आहेत. नंदुरबार चा चार्ज घेताच त्यांनी आपल्या कामाची चुनुक अनेकवेळा दाखवली आहे. पोलीस खात्यात काम करीत असतानाही आपला छंद ते जोपासतात.त्यांना चित्रकलेची विलक्षण आवड आहे.फावल्या वेळात चित्र रेखाटने त्यांना खुप आवडते.त्यांच्या मते,”आजच्या युगात आचरण कसे हवे तर शिवरायांसारखे! अशा आचरणामुळे सर्वच प्रश्न संपतील, मानवी जीवनातील समस्या कमी होण्यास मदत होईल.सर्वत्र समाधानाचे वातावरण होईल
कल्याणकारी राज्याचे प्रणेते असलेल्या राजांचे विचार आजच्या काळाची सर्वाधिक गरज आहे
लोककल्याणकारी राज्यांनी प्रजेचे कल्याण कशात आहे हे जाणले.म्हणूनच त्यांना जाणता राजा असे आदराने म्हटले जाते.रयतेचा राजाने शिकवन दिली की, जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो.श्री पाटील साहेब यांचे विचारही प्रेरणादायी आहेत.

कार्य असे शिवरायांचे, नाही कुणास जमायाचे, म्हणुन नाव घेता त्यांचे, मस्तक आमचे नमायाचे.
शतकांच्या यज्ञातुन उठली एक केशरी ज्वाला,          दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांना
मानाचा मुजरा…!!!

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!