क्राईम न्युजमावळ

 “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत वडगाव मावळ पोलीसांकडुन छापा

छाप्यात,1,08,640/ रुपये किमतीचे मुद्देमालासह 6 किलो 876 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त, 2 आरोपींना अटक

Spread the love

संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत वडगाव मावळ पोलीसांकडुन १,०८६४० रुपये किमतीचे मुद्देमालासह ६ किलो ८७६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त, २ आरोपींना अटक.

 आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी श्रावणी कामत, २६ डिसेंबर.

पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक  अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक  मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांचे संकल्पनेतुन लोणावळा विभागामध्ये “संकल्प नशामुक्ती अभियान” राबविण्यात येत आहे.

आज रोजी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना मिळालेल्या गुप्ता बातमीनुसार त्यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे स्टाफसह मौजै टाकवे
गावचे हद्दीत आरोपी नामे 1) पोपट विठोबा जांभुळकर 2 ) सोमनाथ पोपट जांभुळकर दोन्ही रा.टाकवे बु ता. मावळ. जि. पुणे. यांचे घरावर छापा मारुन त्याठिकाणाहुन आरोपी यांचेकडुन १०८६४०- रुपये किमतीचे मुद्देमालासह ६ किलो ८७६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करुन २ आरोपी यांना ताब्यात घेवुन अटक केलेले आहे.

सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक  अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक  मितेश घट्टे, लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक  सत्यसाई कार्तिक, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  कुमार कदम, मपोउपनि ऋतुजा मोहिते, पोहवा/821
गायकवाड, पोहवा/400 कसेबकर, पोहवा / 1008 सुपे, पोहवा/137 होले, पोना/2413 तावरे,
पोशि/1099 कुंभार, पोशि/2449 पतुरे, यांनी केली. गुन्हयाचा पुढील तपास मपोउपनिरीक्षक ऋतुजा
मोहिते ह्या करत आहेत.

पोलीस निरीक्षक. कुमार कदम यांनी सांगितले की, यापुढेही “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांचे मार्गदर्शनाखाली
कारवाई चालु ठेवणार आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!