आरोग्य व शिक्षणक्राईम न्युज

इमारतीखाली उभी केलेली वाहने अज्ञातांनी जाळली

Spread the love

तळेगाव : तळेगाव स्टेशन परिसरातील इमारतीखाली उभी केलेली वाहने अज्ञातांनी जाळली. ही घटना सोमवारी (29 नोव्हेंबर) रोजी रात्री दीड ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

संतोष नागप्‍पा बिनसाळ (वय 39, रा. म्हाळसकरवाडी तळेगाव स्टेशन) यांनी याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी त्यांच्या गाड्या सोसायटीच्या बाजूला असलेल्या जागेत पार्क केल्या होत्या. अज्ञातांनी सोमवारी मध्यरात्री त्यांच्या गाड्या दीड ते तीन वाजण्याच्या सुमारास पेटवून दिल्या. त्यात गाड्यांचे जवळपास तीन लाख 68 हजारांचे नुकसान झाले आहे. तळेगाव दाभाडे पोलिस पुढील तपास करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!