आरोग्य व शिक्षण

हिताची ॲस्टेमो फाय प्रा.लि.कंपनीतील कामगारांच्या वेतनात भरघोस वाढ

Spread the love

चाकण – चाकण औद्योगिक वसाहतीमधील हिताची ॲस्टेमो फाय प्रा.लि. ( पूर्वीची केहिन फाय प्रा.लि.) कंपनीतील कामगारांना १ ऑक्टोबर २०२१ ते ३० सप्टेंबर २०२४ कालावधी करीता युनियनच्या ३८६ सभासदांना १४ हजार ७५० इतका स्पेशल अलाउंन्स असा वेतनवाढीचा करार हिताची ॲस्टेमो फाय एम्प्लॉईज युनियन व हिताची ॲस्टेमो फाय व्यवस्थापन यांच्यामध्ये खेळीमेळीच्या व शांततेच्या वातावरणात पूर्ण झाला.

जागतिक महामारीमुळे औद्योगिक क्षेत्रात ओढावलेल्या बिकट परिस्थितीतुन जात असतांना यामध्ये वाहन उद्योगसुद्धा प्रभावित झालेला आहे. अशातच वाहन उद्योगासाठी सुटेभाग पुरविणा-या कंपन्यासमोरील अधिकच समस्या आहे. हिताची ॲस्टेमो फाय मोटारसायकलसाठी सुटे भागाचे उत्पादन करणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. इलेक्ट्रीक वाहनांचे वाढते प्रमाण, व्यावसायिक स्पर्धा, ग्राहकाकडील कमी झालेली मागणी यामुळे व्यवसायावर परिणाम झालेला असतांना देखील अशा परिस्थितीत हिताची ॲस्टेमो फाय एम्प्लॉईज युनियन आणि व्यवस्थापनाने कामगारांसाठी वेतनवाढीचा अल्पावधीत म्हणजेच अडीच महिण्यात आदर्शवत करार केला आहे.

कराराची ठळक वैशिष्ट्ये :
एकूण पगार वाढ : १४७५० + स्पेशल अलाउंन्स
कराराचा कालावधी : ३ वर्षे ( ०१/१०/२०२१ ते ३०/०९/२०२४ )
पगार वाढीचे प्रमाण : ८० : १० : १० तीन वर्षासाठी
डेथ बेनवलेंट फंड : ८ लाख रु. वरुन १२ लाख रु. करण्यात आला.
जी. पी. ए. : ५.७५ लाख रु. वरुन १०.०० लाख रु. करण्यात आला.
रजा : एक रजा वाढविण्यात आली
वाढीव पगाराचा फरक : १ ऑक्टोबर २०२१ पासुन संपुर्ण फरक देण्याचे मान्य केले.

युनियन प्रतिनिधींची अभ्यासपुर्ण मांडणी, व्यवस्थापनाचा सकारात्मक दृष्टीकोन आणि कामगारांनी दाखविलेला विश्वास या बाबींचा करार वेळेत पुर्ण करण्यासाठी महत्वाचा वाटा असल्याचे युनियनचे अध्यक्ष दत्तात्रय गायकवाड यांनी सांगीतले.

वेतन वाढीचा हा सातवा करार असुन शांततेच्या मार्गाने कमी वेळेत पुर्ण होण्याची आज पर्यंतच्या सर्व करारातील पहिलीच घटना आहे. या करारामुळे सभासद कामगार समाधान व्यक्त करीत असुन चाकण औद्योगिक परीसरातील कामगार आणि कामगार प्रतिनिधीं कडून युनियन प्रतिनिधींचे अभिनंदन करण्यात येत आहे.

या करारावर व्यवस्थापनाकडून डायरेक्टर सुधीर गोगटे, प्लॅंटहेड यामाझाकी, असिस्टंट प्लॅंट हेड श्रीकांत मापारी, एच. आर. हेड बाजीराव गाजी, इंजि. हेड अजित गुरव, सि.नि. एच. आर. मॅनेजर संपत फडतरे, प्रॉडक्शन हेड भिमराव गायकवाड, संतोष वाळुंज, प्रविण खराडे, प्रशांत ननावरे, अमर मगर.

युनियनच्या वतीने अध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, सरचिटणिस शंकर गडदे, उपाध्यक्ष विजय महाळूंगकर, खजिनदार तुकाराम आवटे, सहचिटणिस प्रदिप बोरुडे, सहचिटणिस मोहन राऊत, सदस्य हनुमंत ठाकरे, सदस्य तुकाराम काळे, जिवन येळवंडे यांनी सह्या केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!