आरोग्य व शिक्षण

तळेगाव दाभाडे स्टेशन विभागात कृत्रिम पाणी टंचाई? आवाज न्यूजच्या हाती ऑडिओ क्लिप 

Spread the love

तळेगाव : तळेगाव दाभाडे स्टेशन भागात विस्कळीत झालेला पाणीपुरवठा कृञिम आहे का ? असा प्रश्न निर्माण झालाय. याला पुष्टी देणारी ऑडिओ क्लिप आवाज न्यूजच्या हाती लागली आहे.

इंद्रायणी जलशुद्धीकरण केंद्रातील दोन्ही वीजपंप नादुरुस्त झाल्याने चार दिवसापासून काही भागात पाण्याचा अनियमित व कमी दाबाने पुरवठा होत आहे. तर काही भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

पुरेसे पाणी सोडण्यासाठी पैसे घेणे, पैसे न देणा-या सोसायट्यांमध्ये कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करत जाणीवपूर्वक त्रास देणे, कामात कुचराई करणे अशा तक्रारी पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी सुभाष पडवळ यांच्याविषयी आल्याने मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी पडवळ याला ८ दिवसांपूर्वी कामावरून कमी केले. त्यानंतर स्टेशन विभागात पाण्याची ओरड निर्माण करण्याच्या सूचना पाणी कर्मचारी पडवळ पाणी ठेकेदार बनसोडे यांना देत असतानाची ऑडिओ क्लिप आवाज न्यूज च्या हाती लागली आहे.

या क्लिप मध्ये पाणी कर्मचारी ठेकेदाराला कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करा. स्टेशन भागात पाण्याची ओरड होऊ द्या अशा सूचना करत आहे. या ऑडिओ क्लिप ची सत्यता जाणून घेण्यासाठी निलंबित कर्मचारी पडवळ यांना संपर्क केला असता माझ्यावरील पैसे घेण्याचा आरोप चुकीचा असून ठेकेदाराच पैसे घेत असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली .

या संपूर्ण प्रकारानंतर तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा कारभार ठेकेदार आणि कामगार संगनमताने चालवत आहे का ? वर्षानुवर्षे मक्तेदारी गाजवणारे ठेकेदार व कर्मचाऱ्यांची अरेरावी मोडीत काढण्यासाठी कार्याध्यक्ष मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी कारवाईचा बडगा उचलल्याने हे निर्ढावलेले  कर्मचारी व ठेकेदार नागरिकांना वेठीस धरत आहेत का? यांच्यावर नेमका कोणाचा वरदहस्त आहे? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!