आरोग्य व शिक्षण

आज पासून तळेगावात रंगणार ‘आमदार करंडक’ स्पर्धा

भव्य हाफपिच प्लाटिक बॉल नाईट स्पर्धा

Spread the love

तळेगाव : शहरातील लायन्स क्लब ग्राउंड वर आजपासून भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंच व सिद्धार्थ किल्लावाला मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

बुधवार 16 फेब्रुवारी ते रविवार 20 फेब्रुवारी या कालावधीत ही ‘आमदार करंडक स्पर्धा’ होणार असून प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना 25 हजार, द्वितीय क्रमांक 15 हजार, तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना 10 हजार रोख रकमेचे पारितोषिक दिले जाणार आहे.

स्पर्धेत 24 संघांनी सहभाग घेतला असून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या नियमांचे पालन करत स्पर्धा पार पाडण्यात येणार आहे. तसेच मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल,तर  बेस्ट बॅट्समनला घड्याळ मॅन ऑफ द मॅच (उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज) अशी बक्षीसांची लयलूट करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!