आरोग्य व शिक्षण

तळेगावातील तळ्यामधील बेकायदा खोदकाम प्रकरणी कठोर कारवाई होणार – प्राजक्त तनपुरे

आमदार शेळके यांनी यासंदर्भात विधान भवनात उठविला आवाज

Spread the love

तळेगाव : तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील तळ्यातील माती, मुरूम, गौण खजिनाच्या बेकायदा खोदकाम प्रकरणी संबंधितां विरोधात कार्यवाही सुरू असून सुनावणीसाठी सूचना पत्र देण्यात आले आहे. या प्रकरणी तातडीने सुनावणी पूर्ण करून दोषी ठरणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत केली.

मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी याप्रकरणी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री तनपुरे बोलत होते. तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत ऐतिहासिक उत्खनन अनियमितता व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबत आमदार शेळके सुमारे दीड वर्ष पाठपुरावा करीत होते.

तळेगाव येथील देवराई संस्थेने बेकायदा उत्खनन करून गौण खजिनांची परस्पर विक्री करत 79 कोटी 64 लाख 94 हजार रुपयांचा महसूल बुडविला. याप्रकरणी स्वतः आमदार शेळके यांनी जुलै 2020 मध्ये जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी तक्रार केली होती. उपविभागीय अधिकारी मावळ अधिकाऱ्यांच्या त्रिसदस्यीय समितीने चौकशी करून तब्बल सातशे पानांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी संबंधित जबाबदार लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.त्यावर अंतिम निर्णय न झाल्याने आमदार शेळके यांनी थेट विधानसभेत या विषयाला वाचा फोडली. शासन या प्रकरणी काय कार्यवाही करण्यात ? किती दिवसात प्रकरण निकाली काढणार व कर भरणाऱ्या सामान्य नागरिकांच्या पैसा वसूल करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नगर विकास राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरातील तलावामधून जलपर्णी व गाळ काढणे करिता आवश्यक प्रक्रिया न करता कामे करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. या व्यतिरिक्त जानेवारी 2018 ते जून 2019 या कालावधीत या ठिकाणच्या तळ्यामधील गाळ माती काढणे व अन्य संबंधित कामांसाठी केलेल्या खर्चाबाबत झालेल्या अनियमिततेबाबत विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांनी सादर केलेल्या अहवालानुसार या अनियमिततांना  जबाबदार सर्व संबंधितांना याबाबत आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांनी शासन स्तरावरून कार्यवाही करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!