देश विदेश

मोठी बातमी ! कोरोना लसीकरण मोहिमेत भारताने गाठला 100 कोटींचा टप्पा

Spread the love

दिल्ली : कोरोना महामारी रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. या लसीकरण मोहीमेत 100 कोटींचा टप्पा पार करत भारताने इतिहास रचला आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील RML हॉस्पिटलला भेट दिली आहे.

या नव्या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताचा डंका जगभरात वाजला आहे. या निमित्ताने खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून आरोग्यमंत्री मनसुख मंडावीया या निमित्ताने लसीकरणावरील एक गाणे आणि चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. भारत सरकारच्या कोविन पोर्टल  आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत शंभर कोटी डोस देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!