आरोग्य व शिक्षण

भाजपचे माजी मावळ तालुकाध्यक्ष रामनाथ विष्णुशेठ वारींगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड.

Spread the love

 

मावळः भाजपचे माजी मावळ तालुकाध्यक्ष रामनाथ विष्णुशेठ वारींगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रामनाथ वारींगे यांची निवड जाहीर केली. भाजपच्या पोरखेळामुळे मी स्वगृही परतलो असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

निवडीचे पत्र मावळचे आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, कार्याध्यक्ष साहेबराब कारके, युवक तालुकाध्यक्ष किशोर सातकर, पुणे जिल्हा नियोजन सदस्य विठ्ठल शिंदे, दीपक हुलावळे आदींच्या हस्ते देण्यात आले.

याप्रसंगी ग्रामीण अध्यक्ष संदीप आंद्रे, पक्षाचे संघटक संजय बावीसकर, माजी सरपंच प्रकाश आगळमे, संतोष जांभुळकर, आशिष ढोरे, पोलीस पाटील भानुदास दरेकर, बाबासाहेब घोजगे, माजी सरपंच भरत घोजगे, वामन वारींगे, समीर जाधव, प्रदीप बनसोडे, सोपान शिंदे, रामनाथ धुमाळ, नवनाथ जाधव, दत्ता जगदाळे, मच्छिंद्र नखाते, रोहिदास जगदाळे, दीपक वारींगे, बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!