आरोग्य व शिक्षणक्राईम न्युज

न्यायालयाच्या आवारात महिलेला डोळा मारल्याने एकाविरुद्ध जुन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल!!

जुन्नर पोलीसांनी महिलेच्या तक्रारीवरुन फारुख पठाण विरुध्द ipc कलम ५०९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Spread the love

न्यायालयाच्या आवारात महिलेला डोळा मारल्याने एकाविरुद्ध जुन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आवाज न्यूज:जुन्नर प्रतिनिधी ५|७|२०२२ फारुख उस्मान पठाण, राहणार बादशहा तलाव, जुन्नर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून कात्रज येथील ३२ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला व फारुख पठाण हे एकमेकांचे ओळखीचे असुन फिर्यादी महिला तिच्या पतीसोबत कामानिमित्त जुन्नर न्यायालयात आले होते.

सायंकाळी न्यायालयातील काम आटोपून फिर्यादी महिला बैलबाजार आवारात आलेली असताना फारुख पठाण याने महिलेकडे अश्लील नजरेने पाहून डोळा मारला.

याबाबत जुन्नर पोलीसांनी महिलेच्या तक्रारीवरुन फारुख पठाण विरुध्द ipc कलम ५०९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!