आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

आळंदी पायी पालखी दिंडीची परतलेल्या वारकऱ्यांचे सह संत तुकाराम महाराज झाडाजवळ काल्याचे कीर्तनाने सांगता..

माऊंलींच्या ७२६ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे निमित्ताने परत आळंदी वरून वारकऱ्यांसोबत दहीकाला केला..

Spread the love

आळंदी पायी पालखी दिंडीची परतलेल्या वारकऱ्यांचे सह संत तुकाराम महाराज झाडाजवळ काल्याचे कीर्तनाने सांगता..

आवाज न्यूज :  लोणावळा  प्रतिनिधी, २६ नोव्हेंबर.

याल तरी यारे लागे । । आवघे माझ्या मागे मागे । ।काल खाऊ पोटभरी । पुरे म्हणाल तोवरी । ।या गवळणीवर अधारीत ह.भ.प. मोरे महाराज यांनी कीर्तन केले.

यावेळी महाराज कीर्तनात सांगतात , भगवान कृष्ण गोकुळात वसुदेव देवकीचे पोटी जन्माला आले. अष्ठ वर्षाची कृष्णमुर्ती पाहून वसुदेव देवकीला भय वाटले.यावेळी देवकी वासुदेवाला म्हणते लपवा , लपवा जगजेठी ! ! यावेळी भगवान लहान रूप घेतात..वसुदेव टोपली मधे भगवंताला घेवून गोकुळात जायला निघाले आसता , त्यांचे हाता पायातील साखळ्या आपोपाप निघाल्या .कारागृहाचे दरवाजाची कुलूपे निघून दरवाजे उघडले गेले. यमुना नदीपाञात जात असताना गळ्याला पाणी लागले., वसुदेवाचे डोक्यावर असलेल्या भगवंताने डावा पाय टोपलीबाहेर काढून यमुना मातेला दर्शन देताच तीचे पाञ दुभंगले. गोकुळात पोहचल्यावर माया घेतली.कृष्णाला तिथे ठेवून वसुदेव परत कारागृहाचे आत आल्यावर कंसाचे पहारेकरी जागे झाले. कंस आला , त्याने मुलगा , मुलगी काहीही न बघता फिरवून आपटणार , पण ती माया हातातून सटकून उंच आकाशात गेली. यावाळी .आकाशवाणी झाली..कंसा तुझा काळ गोकुळात वाढत आहे.! !

गोकुळात कृष्ण वाढत असताना गवळणींना गोपाळ यांना आनंद झाला. कृष्णाला मारण्यासाठी कंसाने पहिलेच पुतना मावशीच्या रूपाने पाठवलेले गि-हाईक कृष्णाने दूध , विष आणि रक्त पिवून पुतनेचा उध्दार केला..! ! असे आनेकांना कृष्ण बलरामांनी मारले..गोकुळात खोड्या केल्या..दही दुधाची चोरी केली..मग गायी राखायला रानावनात कृष्णाला , गोपाळासह पाठवले..तिथे खेळ , हूतूतू , चेंडू फळी , लगोरी , विटी दाःडू आसे खेळले..भुका लागल्याने कृष्णाने सर्वांना रिंगण करून दहीकाला केला.सर्वांना खाऊ घातला .माऊलींनीही पंढरीच्या चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यांचेसोबत दहीकाला केला..आज हा शेवटचा दिवस माऊंलींच्या ७२६ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे निमित्ताने आपण एकञ जमलो..परत आळंदी वरून सर्व आले..फार आनंदात सोहळा संपन्न होत असल्याने आनंदाला पारावार राहिला नाही.., आसे महाराज कीर्तनात म्हणाले..
यावेळी मृदूंगाचार्य तुकाराम घनवट , काशिनाथ गाडे , तसेच संदिप घारे , मापारी ,काटकर आदींनी साथ दिली.गायक ह.भ.प.राम केदारी , नाथामहाराज शेलार , आदींनी साथ दिली.

महाराज यांचा सत्कार मावळ तालुका दिंडी समाजाचे आध्यक्ष तुकाराम गायकवाड व माजी उपनगराध्यक्ष , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विलास बडेकर यांचे हस्ते करण्यात आला. कार्याध्यक्ष ह.भ.प.नारायण ठाकर आणि माजी पंचायत समिती सभापती राजाराम शिँदे यांचे हस्ते .मृदूंगाचार्य तुकाराम घनवट , काशिनाथ गाडे , तसेच महाप्रसाद देणगीदार नरहरी केदारी व पंढरीनाथ केदारी तसेच पालखी रथाचे बैलगाडी मालक .सातकर यांचा सत्कार माजी जिल्हापरिषद सदय्स्य मिलींद बोञे व मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. सूञसंचालन ह.भ.प.विकास महाराज खांडभोर यांनी केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!