आरोग्य व शिक्षण

देशातील युवाशक्ती एकवटली तर भारत देश जगात अग्रगण्य होवू शकेल – उद्योजक अनूप ठाकूर

Spread the love

चिंचवड : चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या वतीने 75 व्या स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. उद्योजक अनुप ठाकूर यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.त्यावेळी उपस्थित प्राध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावरती व्यवसायिक व लायन्स क्लबचे विनोद झुनझुनवाला, मोहन अगरवाल, कमला शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, प्राचार्या पोर्णिमा कदम, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, संचालक डॉ. सचिन बोरगावे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुर्‍हाडे, मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हीस उपस्थित होते.

उपस्थितांच्या वतीने महाविद्यालयातील शैक्षणिक क्षेत्रात विशेष गुणवत्ता मिळविलेल्या उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, प्रा. सारीका जाधव, प्रा. संजीवनी पांडे, प्रा. गुरूराज डांगरे, प्रा. मनिष पाटणकर, डॉ. श्वेता जैन, डॉ. महिमा सिंग, डॉ. रेखा चव्हाण, डॉ. सुवर्णा गायकवाड यांच्यासमवेत कोरोना प्रादुर्भाव काळात अवघ्या जगाला विळखा घातल्यानंतर देवदूतासारखी सामाजिक जाणिवेतून मदत करणार्‍यांना कोरोना योद्धा पुरस्कार स्मृतीचिन्ह स्वरुपात डॉ. हर्षिता वाच्छानी, डॉ. रूपा शहा, गुलामअली भालदार, संदीप शहा, परमेश्वर बनसोडे यांना देण्यात आला. त्याचबरोबर दहावी, बारावी परिक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.

प्रख्यात उद्योजक अनूप ठाकूर पुढे म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यात असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची अहुती दिली. त्यांचे स्मरण करून आज विनम्र अभिवादन करतो. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 80 कोटी युवकांची लोकसंख्या आहे. आज देशात गरीबी, बेरोजगारी असली तरी 80 कोटी युवकांनी विविध क्षेत्रात सामुहीक ताकदीच्या जोरावर उत्तुंग भरारी घेतली तर, जगात भारत देश अग्रगण्य बनण्यास कोणी रोखू शकणार नाही. विकासासाठी सामुहीक योगदानाची, परिश्रम व हातभार लावण्याची आवश्यकता आहे. कोरोना प्रादुर्भाव काळात डॉक्टर्स, नर्स आदींच्या योगदानाबरोबर समाजातील विविध घटकांनी देखील मदतीसाठी पुढाकार घेतला, ही कौतुकास्पद बाब आहे.

संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा प्रास्ताविकात म्हणाले, आपण 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी राष्ट्रगीताबरोबर झेंडा वंदन गीत शालेय विद्यार्थी शाळेतून गातात. यापुढे 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला राष्ट्रगीता बरोबरच झेंडा गीत सामुदायिक गायनाची प्रत्येकाने शपथ अंगीकारावी. कारण झेंडा गीतातील प्रत्येक ओळीला अर्थ आहे. देशप्रेमाबरोबर एक सुजाण नागरिक म्हणून कसे जगायचे याची प्रेरणा या गीतापासून मिळते. प्रत्येकाने केलेल्या चांगल्या कामावर समाधान न मानता, पुढे आणखी अधिकचे चांगले काम कसे करता येईल याचा प्रत्येकाने ध्यास अंगीकारावा. प्रत्येकाकडे प्रचंड क्षमता आहे. आपल्या कर्तृत्वाला कल्पकतेची जोड देत आजपासून संकल्प करा, असे आवाहन करून शैक्षणिक गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व कोरोना योद्धा पुरस्कार प्राप्त संस्थेतील मान्यवरांचे विशेष अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुवर्णा गायकवाड, डॉ. आनंद लुंकड पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. अस्मिता यादव, डॉ. रविंद्र निरगुडे, डॉ. सुनिता पटनाईक यांनी पारितोषिक वाचन केले. तर; आभार प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रमोद इंगळे, प्रा. शबाना शेख, प्रा. मनिषा पाटील, प्रा. गिता कांबळे, प्रा. सुशिल भोंग, डॉ. संतोष उमाटे, प्रा. अंजू वंजारी, प्रा. सुजिता गुप्ता समवेत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!