आरोग्य व शिक्षण

स्वातंञ्यदिनानिमित्त कॉग्रेसआय तर्फे लोणावळ्यातील गवळीवाडा येथे माजी स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान

Spread the love

लोणावळा : स्वातंञ्यदिनानिमित्त कॉग्रेसआय तर्फे लोणावळ्यातील गवळीवाडा येथे माजी स्वातंत्र्य सैनिकांना  आजी – माजी नगरसेवक व उपनगराध्यक्षा यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड यांचे उपस्थितीमधे ध्वजवंदन श्रीराम मंदिरासमोर झाले. माजी स्वातंत्र्य सैनिकांना स्मृतीचिन्हे , शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात आले.भारताच्या ७५ व्या स्वातंञ्यदिनानिमित्त लोणावळ्यातील काॕँग्रेस आय व युवक काॕँग्रेस तसेच सेवादल यांच्या वतीने माजी स्वातंत्र्य सैनिकांना स्मृतीचिन्हे देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना मान्यवर यांचे हस्ते नियुक्ती पञे देण्यात आली.

यावेळी युवक कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कविश्वर, नगरसेवक सुधिर शिर्के , उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल , नगरसेविका सुवर्णा आकोलकर, पूजा गायकवाड , श्रीराम क्रीडा मंडळ संस्थापक महादेव गवळी , काॕँग्रेस आय सेवादलाचे शहराध्यक्ष सुनिल मोगरे , युवक काॕँग्रेस आध्यक्ष दत्ता दळवी , माजी उपनगराध्यक्ष धिरूभाई कल्याणजी , कांग्रेसचे पदाधिकारी रवि सलोजा तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!