अध्यात्मिकसामाजिक

श्री भगवान पार्श्वनाथ ची महिमा अपरंपार प.पू.मु.श्री.पियुषचंद्र विजयजी महाराज..

Spread the love

श्री भगवान पार्श्वनाथ ची महिमा अपरंपार
प.पू.मु.श्री.पियुषचंद्र विजयजी महाराज..The glory of Shri Bhagwan Parshwanath is immeasurableHis Excellency Mr. Piyushchandra Vijayji Maharaj..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १४ जुलै.

परमपथ अध्यात्मिक चातुर्मास २०२३ – श्री जीरावला पार्श्वनाथ जैन मंदिर,तळेगाव दाभाडे येथे,आज पासून तळेगाव शहरातील जैन बांधवां मध्ये तीन दिवसाचा श्री पार्श्वनाथ भगवान चा अट्टम तप ( तीन दिवसीय निरंकार तपस्या ) चालू झालेला आहे परमपूज्य गुरुदेव पियुषविजयजी महाराज साहेब यांनी सर्व तपस्वींना शुभेच्छा दिल्या.

जैन धर्माच्या 24 तीर्थकरा पैकी 23 वे तीर्थंकर श्री पार्श्वनाथ भगवान च्या उपासनेचा हात तप आहे.
गुजरात मधील शंकेश्वर पार्श्वनाथ या ठिकाणी दर पौर्णिमेला हजारो भाविक सेवापूजेसाठी जातात त्या ठिकाणी हजारो वर्ष प्राचीन प्रतिमा असल्याने भाविकांची खूप मोठी श्रद्धा आहे. अशा भगवान पार्श्वनाथ यांच्या भक्तीने ही तपस्या आजपासून सुरू झालेली आहे. व रोज भगवान पार्श्वनाथ यांची महिमा याचे विवेचन पुढील तीन दिवस परमपूज्य गुरुदेव करणार आहेत.

तळेगाव दाभाडे येथील जिरावाला पार्श्वनाथ जैन मंदिरामध्ये परोपकारी सम्राट आचार्य श्री ऋषभचंद्र सुरिश्वरजी महाराज साहेबा यांचे अज्ञानु वरती शिष्य पंचम वर्षीतप तपस्वी मुनीराज श्री पियुषचंद्र विजयजी महाराज साहेब, मुनी.श्री. रजतचंद्र विजयजी महाराज साहेब,मुनी श्री प्रितेशचंद्र विजयजी महाराज साहेब यांचा परमपथ चातुर्मास २०२३ मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

रोज सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत चातुरमासा निमित्त प्रवचन श्री जिरावला पार्श्वनाथ जैन मंदिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे.तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिरावाला पार्श्वनाथ जैन मंदिराचे विश्वस्त यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!