आरोग्य व शिक्षणक्राईम न्युज

आठ अ चा बनावट उतारा बनवून त्यावर ग्रामसेवकाची खोटी सही करणाऱ्यास अटक

Spread the love

वडगाव : अंदर मावळातील कुसवली गावात एकाने ग्रामपंचायतीचा बनावट शिक्का बनवून त्या आधारे आठ अ चा बनावट उतारा तयार केला व त्यावर ग्रामसेवकाची खोटी सही केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी भाऊ लक्ष्मण गवारी (रा. कुसावली) याला अटक करण्यात आली आहे. कुसावली चे ग्रामसेवक रत्नाकर रत्नपारखे (रा.वडगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गवारी यांनी 6 जुलै पुर्वी ग्रामपंचायतीचा खोटा शिक्का तयार करून त्याआधारे लहू पांडुरंगाची चिमटे यांना आठ अ चा उतारा तयार करून दिला व त्यावर ग्रामसेवकाची बनावट सही केली.

ग्रामसेवकाच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष चामे करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!