क्रीडा व मनोरंजनमावळ

मराठी साहित्य परिषद तळेगाव शाखा अध्यक्ष- श्रीकृष्ण पुरंदरे सरांच्या” छंद अंकाचं”- प्रकाशन..

सुरेश साखवळकर आणि डॉ शालिग्राम भंडारीं यांच्या शुभहस्ते- भंडारी व्हीला येथे संपन्न..

Spread the love

मराठी साहित्य परिषद तळेगाव शाखा अध्यक्ष- श्रीकृष्ण पुरंदरे सरांच्या” छंद अंकाचं”- प्रकाशन सुरेश साखवळकर आणि डॉ शालिग्राम भंडारीं यांच्या शुभहस्ते- भंडारी व्हीला येथे संपन्न.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २४ ऑगष्ट.

या समारंभास कवि मा प्राचार्य सुरेश अत्रे- दूरदर्शनचे मा डायरेक्टर अश्विनी कुमार- डॉ रवी आचार्य ला महेश भाई शहा- ला दीपक बाळसराफ- ला भरत पोद्दार ला राधेश्याम भंडारी आणि  विनायक हेंद्रे हे ही उपस्थित होते. प्रसंगी साखवळकर म्हणाले की छंद अंक लिहिणाऱ्या लेखकाचं मन अत्यंत संवेदनशील असावं लागत आणि हे पुरंदरेंच्या व्यक्तिमत्त्वात पूर्णत्वाने आहे. म्हणूनच त्यांनी या अंकात सातत्य ठेवलेले आहे. त्यासाठीच पुरंदरे सरांचं  मनःपूर्वक अभिनंदन. डॉक्टर शालिग्राम भंडारी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना- छंद अंकातील प्रत्येक विषय हा निरीक्षण परीक्षण आणि समीक्षणाच्या पायावर उभारलेला आहे म्हणूनच तो वाचकांच्या अंतकरणाला भिडतो.

प्रतिभे विषयी असं म्हटलं जातं की- नव- नवओनमेष शालिनी इती- प्रतिभा, म्हणजेच जी प्रत्येक वेळी नवनवीन रूपात प्रगटते ती प्रतिभा, आणि ही पुरंदरे सरांच्यात उपजतच आहे म्हणूनच त्यांचं लिखाण हे आपल्याच आयुष्याशी निगडित आहे अशा अनुभूतीने प्रत्येक वाचकांच्या हृदयाचं ठाव घेत, या आगळ्यावेगळ्या लेखन निर्मिती संदर्भात पुरंदरे सर म्हणाले की- पडदा खिडकी- भेळ- असे विषय डोळ्यासमोर आले की मी त्या त्या वस्तूंचे- पदार्थांचे प्रकार बघतो. लोकांच्या चाली रीती रुढी विषयी असलेले माझे निरीक्षण शब्दात उतरवतो, या लेखनांना माझ्या वाचकांचा भरपूर प्रतिसाद मला मिळतो त्यामुळे तीच भविष्यातील माझ्या लेखनाची ऊर्जा ठरते.

छंद- अंकाच्या प्रकाशना नंतर डॉ रवी आचार्य आणि त्यांचे साथीदार शिवाजी होनावळे यांनी हिंदी मराठी भावगीत सादर करून आम्हा रसिक श्रोत्यांना भूतकाळातील अत्यंत तरल गोड आठवणीत केव्हा नेऊन ठेवले हे आम्हालाही कळलं नाही.

अश्विनी कुमारांनी गीता- महाभारत संबंधावर स्वरचित गायलेल्या भजनाने- “भजन सम्राट अनुप- जलोटाचीच” आठवण आम्हाला करून दिली! प्राचार्य सुरेश अत्रे सरांनी आपल्या मनोगतात विविध क्षेत्रात विलक्षण उंचीवर असलेल्या उपस्थितांच अभिनंदन केल.

साहित्य कला क्षेत्रातील असे कार्यक्रम प्रत्येक महिन्याला आयोजित करावे अशीही इच्छा सरांनी व्यक्त केली, त्यांच्या या सूचनेला- ला महेश भाई शहा आणि ला दीपक बाळसराफ विनायक हेंद्रे- भरत पोतदार यांनीही अनुमोदन दिलं. संगीताअलंकार सुरेश साखवळकर सरांनी” भैरवी म्हणून संत कानोपात्रातील”- नाट्यगीत- सादर करून समारंभ एका विशिष्ट उंचीवर देऊन ठेवला. राधेश्याम भंडारीच्या आभार प्रदर्शनानंतर सुग्रास भोजनाने समारंभाची सांगता झाली! भंडारी व्हीला सोडताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा विलक्षण आनंद आणि समाधान- हीच या समारंभाच्या यशस्वीतेची पावती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!