Puneक्रीडा व मनोरंजनसामाजिक

यंदाची राखी इसरो (ISRO) शास्त्रज्ञ व सीमेवरील जवानांसाठी.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणे जिल्हा युवती आघाडी..

Spread the love

यंदाची राखी इसरो (ISRO) शास्त्रज्ञ व सीमेवरील जवानांसाठी ; अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणे जिल्हा युवती आघाडी.This year’s Rakhi for ISRO scientists and border guards; All India Brahmin Federation, Pune District Youth League.

आवाज न्यूज : श्रेयश परदेशी पुणे प्रतिनिधी, २६ ऑगष्ट.

आपला भारत देश सुरक्षित रहावा म्हणुन घरापासून हजारो किलोमीटर लांब, सर्व सण-समारंभ यांना पाठ फिरवून, निधड्या छातीने, अभिमानाने देशांच्या “सीमेवर तैनात असलेल्या आपल्या जवानांसाठी” तसेच “चांद्रयान-3” हे यान अंतरिक्षात पाठवून जगभरात गर्वाने आपली मान उंचावणाऱ्या “इसरो (ISRO) शास्त्रन्यांना”, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या युवती आघाडीच्या वतीने, सहाशे च्या वर राख्या, एका बहिणीचे कर्तव्य म्हणुन पाठवण्यात आल्या ज्या येत्या रक्षाबंधनाला या मान्यवरांच्या हातात बांधल्या जातील.

सामाजिक संघटनेची जाणीव ठेवताना, राष्ट्र प्रथम या भावनेतून राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंदजी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे जिल्हा अध्यक्ष. मंदारजी रेडे यांच्या नेतृत्वाखाली “युवती आघाडी” अध्यक्ष सरस्वती जोशीयांनी ही अभिनव कल्पना मांडली ज्याला सर्व पदाधिकारी यांनी दुजोरा दिला.जिल्ह्याच्या प्रत्येक भागातून सभासदांनी राख्या आणून दिल्या ज्या एकत्रितपणे इसरो मुख्यालय, सीमेवर योग्य नियोजनाने पाठवण्यात आल्या.

देशाअंतर्गत प्रश्नांची योग्य दखल घेत असताना , देशाच्या अस्मितेच्या प्रती आपली सदभावना युवती आघाडीने राख्या पाठवून केली याचा सार्थ अभिमान आहॆ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!