कृषीवार्तामावळ

वराळे मावळ येथे आढळला दुर्मिळ खवल्या मांजर 

वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खवल्या मांजरास कुठलीही ईजा न करता सुरक्षितरित्या पकडून त्याच्यावर प्राथमिक उपचार करत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Spread the love

वराळे मावळ येथे आढळला दुर्मिळ खवल्या मांजर.A rare yellow cat found at Varale Maval.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २६ ऑगष्ट.

वराळे गावच्या हद्दीतील समता कॅालनी येथे एका घरात आढळलेल्या दुर्मिळ खवल्या मांजराला जीवनदान देण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव रक्षक संस्थेच्या सदस्यांनी ही कामगिरी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील शशिकांत गिरी यांच्या घरी कोणता तरी वेगळाच प्राणी आला असल्याचा फोन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य रोहीत दाभाडे व शेखर खोमणे यांना आला व त्यांनी त्या प्राण्याचे फोटो मागीतले असता ते खवल्या मांजर असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लगेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांना फोन करुन त्याची माहिती दिली. त्यानंतर तत्काळ संस्थेचे सदस्य संकेत मराठे, निनाद काकडे, प्रथमेश मुंगनेकर, शेखर खोमणे, रोहीत दाभाडे, रोहन ओव्हाळ, नयन कदम, भास्कर माळी, गणेश गायकवाड, दत्ता भोसले, निलेश संपतराव गराडे हे वराळे,समता कॉलनीत  गेले.

सदर ठिकाणाची पाहणी केली असता ते खवल्या मांजर हे जनरेटर रुममध्ये जनरेटरखाली बसल्याचे दिसले. त्याची ओळख नसल्याने घरातील वातावरण मात्र भितीचे होते. आजूबाजूलाही मोठी लोकवस्ती होती. गराडे यांनी याची माहिती वनविभागाला दिली. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खवल्या मांजरास कुठलीही ईजा न करता सुरक्षितरित्या पकडून त्याच्यावर प्राथमिक उपचार करत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

भटक्या कुत्र्यांच्या बोलबाल्यामुळे ते खवल्या मांजर घाबरुन घरात शिरले असावे, असा अंदाज वन्यजीव रक्षक संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांनी व्यक्त केला. तसेच अतीशय दुर्मिळ असलेले हे खवल्या मांजर ९ वर्षांपूर्वी देहूरोड येथे आढळल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!