आरोग्य व शिक्षण

स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तर्फे ‘रक्षाबंधन’ ऑनलाइन स्वनिर्मित राखी स्पर्धेचे आयोजन

Spread the love

तळेगाव : श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे ;येथे शनिवार दिनांक 21- 8 -2021 रोजी रक्षाबंधन सणा निमित्त ऑनलाइन ‘राखी निर्मिती स्पर्धा’ आयोजित करण्यात आली .

प्रत्यक्ष शाळेत येणे शक्य नसले ,तरी देखील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेत स्व -निर्मितीचा आनंद घेतला. स्पर्धेत स्वनिर्मित सुंदर राख्या शालेय विद्यार्थ्यांनी सादर केल्या. कलेच्या माध्यमातून रक्षाबंधनाचा सण साजरा करताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन स्व निर्मितीस प्रोत्साहन देण्यात आले. पर्यावरण पूरक राखी निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी; स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे सचिव मिलिंदजी शेलार, शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख  इत्यादी मान्यवरांनी शालेय परिसरातील वृक्षांना राखी बांधून अनोख्या उपक्रमातून रक्षाबंधन सण साजरा केला .

स्पर्धेचे आयोजन नियोजन शालेय मुख्याध्यापिका  शमशाद शेख , पर्यवेक्षिका  .रेणू शर्मा , शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. .स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या विविध कलाकुसरीत प्रोत्साहनपर मार्गदर्शन मुख्याध्यापिका  शमशाद शेख यांनी केले .

कोरोना काळात स्वातंत्र्य सैनिकांना प्रत्यक्ष राखी बांधून शुभेच्छा देणे शक्य नसल्याने ऑनलाइन पद्धतीनेच त्यांना मानवंदना देऊन राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या स्तुत्य उपक्रमाचे श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  संतोषजी खांडगे  ,सचिव  मिलिंदजी शेलार  शालेय समिती अध्यक्षा  रजनीगंधा खांडगे यांनी कौतुक केले.

स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना ई -प्रमाणपत्र वितरित करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!