आरोग्य व शिक्षणक्राईम न्युज

चेकवर बनावट सही करून बँकेत भरला;कोट्यावधींची फसवणूक केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Spread the love

तळेगाव : चेकवर कोट्यवधींची रक्कम टाकून त्यावर बनावट सही करून चेक बँकेत भरला व त्याद्वारे कोट्यवधींची फसवणूक केली. ही घटना 21 एप्रिल ते 19 ऑगस्ट या कालावधीत आयडीबीआय बँकेच्या तळेगाव दाभाडे येथील शाखेत घडली.

याप्रकरणी मिलिंद भागवत पोखरकर (वय 53) रा. तळेगाव स्टेशन यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार रोहन अजित भालेराव (रा.तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने चेकवर बनावट सही करत त्यांच्या बँकेच्या खात्यावरील 1 कोटी 15 लाख 52 हजार 840 रुपये रक्कम मार्क व्हेंचर या कंपनीचे नावे बँकेत भरली. तसेच दुसऱ्या चेकवर 30 लाख 37 हजार 500 रुपये इतकी रक्कम टाकून चेक कपिला इंटरप्राईजेस या कंपनीच्या खात्यावर भरला.

फिर्यादीने विश्वासाने 2017 साठी आरोपीला पाच कोरे चेक दिले होते. आरोपीने चेकद्वारे पैसे काढून ते बँकेत जमा करून फिर्यादी यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!