अध्यात्मिकक्रीडा व मनोरंजनमावळ

वै. मृदूंगाचार्य दत्तोबा महाराज शेटे यांच्या १६व्या पुण्यस्मरणानिमित्त होणार सन्मान..

गुणवंत शिक्षकांचा , पञकार व महाराष्ट्र केसरी पैलवान यांचा सन्मान मान्यवरांचे हस्ते शेटेवाडी , श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिरात ता.२८ रोजी करण्यात येणार आहे.

Spread the love

 वै. मृदूंगाचार्य दत्तोबा महाराज शेटे यांच्या १६व्या पुण्यस्मरणानिमित्त होणार सन्मान.. गुणवंत शिक्षकांचा , पञकार व महाराष्ट्र केसरी पैलवान यांचा सन्मान मान्यवरांचे हस्ते शेटेवाडी , श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिरात ता.२८ रोजी करण्यात येणार आहे.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २७ ऑगष्ट.

वैकुंठवासी मृदूंगाचार्य दत्तोबा महाराज शेटे यांच्या १६व्या पुण्यस्मरणानिमित गुणवंत शिक्षकांचा , पञकार व महाराष्ट्र केसरी पैलवान यांचा सन्मान मान्यवरांचे हस्ते शेटेवाडी , श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिरात ता.२८ रोजी करण्यात येणार आहे.

ता.२८ रोजी सकाळी ९ वाजता महापूजा व अभिषेक होमहवन श्री विठ्ठल मंदिरात होईल. दुपारी १२ वा.पुण्यस्मरणानिमित विधी व नैवेद्य , सायंकाळी ४ ते ५ सत्कार समारंभ वैकुंठवासी दत्तोबा महाराज शेटे प्रतिष्ठानतर्फे गुणवंत वारकरी , अध्यापक , पञकार व पैलवान यांना मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे.कीर्तनकार ह.भ.प. बाळकृष्ण महाराज वचकल (वीर), विणेकरी ह.भ.प.भाऊसाहेब महाराज टाकळकर , (आळंदी ते पंढरपूर पायीवारी ),सौ.संगीता बालघरे (अध्यापिका , खांडी ) राजेंद्र लासूरकर , मुख्याध्यापक साळुंब्रे ) ,
तसेच यावेळी विशेष सत्कार महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे ,महिला पैलवान कु.तृप्ती शा.निंबळे ,राष्ट्रीय युवा खेळाडू पै. कु.समृद्धी मुकूंद भोसले , लोकमत चे ज्येष्ठ पञकार विलासराव भेगडे , मावळवार्ता चे संपादक संजय अडसुळे , महाराष्ट्र चँपियन पै.सागर बाबर आदीँचा सत्कार यावेळी करण्यात येईल.

सायंकाळी ५ ते ६ ह.भ.प.वाणीभूषण पंकजमहाराज गावडे,(पी.एच.डी )तत्त्वज्ञान , यांचे प्रवचन व त्यानंतर बाळासाहेब वायकर यांचे सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम होईल.
सत्कार समारंभ भोसरीचे आमदार पै.महेशदादा लांडगे, चिंचवड च्या आमदार अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप, भंडारा डोंगर दशमी समिती विश्वस्थ , ह.भ.प.जालिंदर महाराज काळोखे , ह.भ.प.नंदकुमार भसे (संस्थापक मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळ), किसान संघाचे माजी अध्यक्ष शंकरराव शेलार , किर्तनकार संतोष काळोखे , पिंपरी चिंचवड च्या माजी महापौर माया तथा उषाताई ढोरे आदी मान्यवरांचे हस्ते सत्कार होणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजक भजनसम्राट मावळभूषण ह.भ.प.नंदकुमार शेटे , निमंञक यशवंत दत्तोबा शेटे , रामदास यशवंत शेटे (उपसरपंच ), उद्योजक मयुर नंदकुमार शेटे,उद्योजक मनोज नंदकुमार शेटे  हे करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!