क्राईम न्युजमावळ

भंडारा डोंगर परिसरात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, देशी पिस्तूलांसह  मुद्देमाल जप्त.

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ५ आणि तळेगाव एमआयडीसी पोलिस यांच्या पथकाने ही संयुक्त कामगिरी केली.

Spread the love

भंडारा डोंगर परिसरात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद,  देशी पिस्तूलांसह  मुद्देमाल जप्त..Robbery gang arrested in Bhandara mountain area, items seized including country pistols..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २७ ऑगष्ट.

भंडारा डोंगर परिसरात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद,  देशी पिस्तूलांसह  मुद्देमाल जप्त..

मावळ तालुक्यातील प्रसिद्ध भंडारा डोंगर परिसरात दरोडा टाकणाऱ्या टोळीतील ५ जणांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.मावळ तालुक्यातील प्रसिद्ध भंडारा डोंगर परिसरात दरोडा टाकणाऱ्या टोळीतील ५ जणांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ३ देशी बनावटीचे कट्टे, सहा राऊंड, एक लोखंडी कोयता, सहा मोबाईल आणि २ दुचाकी असा एकूण ९७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ५ आणि तळेगाव एमआयडीसी पोलिस यांच्या पथकाने ही संयुक्त कामगिरी केली.

निरज भिकमसिंग सेन (वय २१, रा. तळेगाव स्टेशन, तळेगाव दाभाडे, मूळ रा. बौरावती, ता. शेहपूर, जि. धौलपूर, राजस्थान), योगेश सोरंग माहोर (२०, रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. आरुआ, ता. बाडी, जि. धौलपूर, राजस्थान), सुनील ओमीप्रकाश माहोर (१९, रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. मिडाकूर, ता. मलपुरा, जि. आग्रा, उत्तरप्रदेश), श्यामसिंग मुन्नीलाल कोली (३५, रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. अरुआ, पो. मरहोलीता, ता. बाडी, जि. धौलपूर, राजस्थान), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एका बालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा डोंगराच्या पायथ्याला कमानीजवळ सुदवडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला ५ जण अंधारात संशयितरित्या थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून ५ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ३ देशी बनावटीचे कट्टे, ६ राऊंड, १ लोखंडी कोयता, ६ मोबाइल आणि दोन दुचाकी असा ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडील दुचाकी व एक मोबाइल माळवाडी ते वराळे रस्त्यावर एका व्यक्तीला मारहाण करून चोरी केली असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तसेच त्यांच्याकडील दुसरी दुचाकी ही गुन्हा करताना वापरली असल्याचेही सांगितले. दुचाकी चोरीप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज खंडाळे, तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज पांडे, पोलिस उपनिरीक्षक राहुल कोळी, पंडीत आहिरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!