देश विदेश

उंड्री उपकेंद्राच्यावतीने जागतिक योगा दिन साजरा

Spread the love

प्राचीन भारतीय योग विद्या ही पाच हजार वर्षांपासून प्रचलित आहे.पाश्चात्य देशांमधेही योगा चं महत्त्व सिद्ध झालेलं आहे.योगाभ्यासामुळे शरीर आणि मन यांची एकाग्रता साधली जाते.21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.
जागतिक योग दिनाचं औचित्य साधून उंड्री उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत जाधव यांनी निवडे गावामधील नागरिकांबरोबर जागतिक योग दिन साजरा केला.
डॉ.जाधव यांनी नागरिकांना योगाचं महत्त्वं समजावून सांगितलं. कोरोनाच्या पार्वभूमीवर प्राणायामाचं महत्त्व समजावून सांगितलं. सूर्यनमस्कार,ताडासन,सिंहासन,शवासन ही आसने करुन घेतली.तसेच मनःशांती साठी ध्यानधारणा करुन घेतली.योगामुळे आपण कशाप्रकारे अनेक व्याधींपासून मुक्त होऊ शकतो याचे मार्गदर्शन केले.
यावेळी उंड्री उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत जाधव,आरोग्य सेवक संदीप पाटील,परिचारिका कविता भोसले,आशास्वयंसेविका सुनिता सुतार आणि मदतनीस रंजना कांबळे आदी उपस्थित होते.
योगाभ्यासामुळे शरीर,मन आणि आत्मा यांच्यावर नियंत्रण मिळून मन शांत होते,शरीर लवचिक होते.निरोगी आयुष्यासाठी सर्वांनी दररोज योगा करावा.

डॉ.अभिजीत जाधव
समुदाय आरोग्य अधिकारी
उपकेंद्र उंड्री

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!